सातारा 

पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली केळी उत्पादक शेतकऱ्यांची भेट

कराड ​(​अभयकुमार देशमुख) :
तौक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांना जरी मोठा फटका बसला असला तरी राज्यातील इतर भागात सुद्धा या चक्रीवादळाचा फटका बसलेला आहे. सातारा जिल्ह्यात सुद्धा काही भागात वादळाचा फटका बसला आहे. कराड तालुक्यातील चचेगाव येथील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या सात एकरातील केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची पाहणी करण्याकरिता कराड दक्षिणचे आमदार तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चचेगाव येथील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावर भेट ​दिली. 

यावेळी ​चव्हाण यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली, केळी उत्पादन बाबत माहिती घेतली उत्पन्न निघायच्या वेळी निसर्गाने घाला घातल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत या शेतकऱ्यांना आधार देत आ. चव्हाण यांनी नुकसान झालेल्या केळीच्या बागेचे पंचनामे जलदगतीने करून शासनाकडे पाठवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. याची नुकसानभरपाई लवकरात लवकर शासन स्तरावर मिळण्यासाठी पाठपुरावा करण्याची सुद्धा ग्वाही यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी शेतकऱ्यांना दिली.
यावेळी त्यांच्यासोबत कराडचे तहसीलदार अमरदीप वाकडे, तालुका कृषी अधिकारी मुल्ला, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, पंचायत समिती सदस्य उत्तमराव पाटील, सातारा जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस राजेंद्र चव्हाण, चचेगाव ग्रा.पं. सदस्य राहुल पवार, , अभिजीत चव्हाण, राहुल काळुखे यांच्यासह केळी उत्पादक हणमंत हुलवान, साहेबराव पवार, विलास पवार, संदीप पवार हे शेतकरी सुद्धा उपस्थित होते.

पृथ्वीराज चव्हाण ​यांनी यावेळी सांगितले कि, तौक्ते चक्रीवादळाचा फटका राज्यात फक्त कोकण भागातच बसला नसून राज्यातील इतरही भागात बसला आहे. कराडजवळील चचेगाव येथील  केळी उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने व अभिनव पद्धतीने तयार केलेली केळीची बाग या वादळामुळे पूर्णपणे भुईसपाट झालेली आहे. या शेतकऱ्यांच्या शेतीतील नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाकडे पाठवण्याच्या सूचना मी प्रशासनाला दिल्या आहेत. राज्यात जिथे जिथे चक्रीवादळामुळे नुकसान झालेले आहे अश्या ठिकाणचे पंचनामे करण्याचे आदेश राज्य सरकारने दिलेले आहेत. बाधितांना लवकरच याची नुकसान भरपाई शासनाकडून दिली जाईल.

banana
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: