सातारा 

‘ग्रामीण आरोग्य व्यवस्था होणार अधिक सक्षम’

कराड (अभयकुमार देशमुख) :

तालुक्यातील म्हासोली, येळगाव, मस्करवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, पोतले आरोग्य उपकेंद्र आणि सातारा तालुक्यातील काशीळ ग्रामीण रुग्णालय आदी रुग्णालयांमध्ये पुरेसे कुशल वैद्यकीय मनुष्यबळ नसल्याचा प्रश्न प्रलंबित होता याठिकाणी मनुष्यबळ उपलब्ध व्हावे जेणेकरून या भागातील जनतेस आरोग्य सेवा देता येईल यासाठी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण हे प्रयत्न करीत होते त्यांच्या प्रयत्नांना यश येत शासनाकडून काल शासन आदेश पारित झाला असून त्यानुसार या सर्व रुग्णालयात कुशल मनुष्यबळाची मंजुरी मिळाली आहे. राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे व ग्रामीण रुग्णालयांमध्ये जिथे जिथे गरज आहे अश्या ठिकाणी हि वैद्यकीय मनुष्यबळाची तरतूद शासनाकडून करण्यात आली असून तसा शासन आदेश सुद्धा काल निघाला आहे.

 

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड दक्षिण मतदारसंघातील म्हासोली व येळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच कराड तालुक्यातील मस्करवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी १५ जणांचे वैद्यकीय  मनुष्यबळ शासनस्तरावर मंजूर करण्यात आले आहे तसेच पोतले आरोग्य उपकेंद्रासाठी ३ जणांचे वैद्यकीय  मनुष्यबळ मंजूर करण्यात आले आहे याचसोबत सातारा तालुक्यातील काशीळ येथील ग्रामीण रुग्णालयाची मंजुरी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना झाली होती. या रुग्णालयाचे बांधकाम काही महिन्यांपूर्वी पूर्ण झाले असून येथे २६  वैद्यकीय  मनुष्यबळाची मंजुरी शासनाकडून मिळाली आहे. या सर्व रुग्णालयांमध्ये कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेता आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला या त्यांच्या प्रयत्नाला यश आले असून याबाबतचा शासन आदेश नुकताच काढण्यात आला आहे. या सर्व ठिकाणी लवकरच आवश्यक वैद्यकीय  मनुष्यबळ उपलब्ध होईल जेणेकरून या भागातील जनतेला आरोग्य सेवा देण्यात येईल. काशीळ ग्रामीण रुग्णालय, मस्करवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र व पोतले आरोग्य उपकेंद्र हि पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मंजूर झाली आहेत व त्यांचे बांधकाम काही महिन्यांपूर्वी पूर्ण झालेले आहे या सर्व ठिकाणी वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध होणार असून सर्व आरोग्य केंद्रे कार्यक्षमरित्या कार्यरत राहतील.जनतेच्या आरोग्याप्रती कायम सतर्क असणाऱ्या आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी ग्रामीण भागात आरोग्य सेवा सक्षम करण्यावर भर दिला आहे हे यामधून दिसून येते.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: