नाशिक

नाशिकची खाजगी रुग्णालये घेणार नाहीत आता कोरोना रुग्ण 

नाशिक  (अभयकुमार देशमुख):
नाशिक हॉस्पीटल ओनर्स असोशिएशन आणि इतर वैद्यकीय संघटनांनी मोठा निर्णय घेतला आहे. उद्यापासून नाशिकमधील खाजगी रुग्णालये कोरोनाचे रुग्ण दाखल करुन घेणार नाहीत. तसे पत्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना हॉस्पीटल ओनर्स असोशियशन आणि इतर वैद्यकीय संघटनाकडून देण्यात आले आहे.

मागील दिड वर्ष सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी कोरोना महामारीत दिवसरात्र काम केले असून आता मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवत असल्याने २ जून पासून जिल्ह्यातील कोणत्याही खाजगी रुग्णालयात कोरोनाचे रुग्ण दाखल करून घेणे शक्य नसल्याचे संघटनेच्यावतीने सांगण्यात आले आहे.

नाशिक हॉस्पीटल ओनर्स असोशिएशन आणि इतर वैद्यकीय संघटनांचे नेमके म्हणणे काय आहे. वाचा सविस्तर त्यांच्या पत्रामध्ये…

nashik

Share

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: