देश-विदेश

‘२० रिफॉर्मस् इन २०२०’चे प्रकाशन

नवी दिल्ली :
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते काल `२० रिफॉर्मस् इन २०२०` या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. रक्षा मंत्रालयाच्या दिल्ली येथील कार्यालयात संपन्न झालेल्या का कार्यक्रमाला रक्षा राज्य मंत्री श्रीपाद नाईक हेही उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकार नेहमी संरक्षण क्षेत्राशी निगडित उत्पादनाच्या बाबतीत स्वावलंबी बनण्याच्या दिशेने ठोस पावले उचलत आला आहे.` मेक ईन इंडिया` या उपक्रमाचा एक भाग म्हणून स्थानिक साहित्य व सॉफ्टवेअर या गोष्टींना प्राधान्य दिले जात आहे.  `डिफेन्स प्रोक्योरमेंट पॉलिसी २०२०` (डीपीपी)च्या मसुद्याचे विमोचन करण्यात आले असले तरी, त्यात स्वदेशी सामग्रीला प्राधान्य देण्यात आलेले आहे.

संरक्षण क्षेत्रात रचनात्मक सुधारणा करण्यासाठी कोविड़ १९ महामारीमुळे उद्भवलेल्या कठीण परिस्थितीकडे एक संधी म्हणून पाहिले गेले. हे करत असताना सरंक्षण मंत्र्यांनी संरक्षण धोरणांच्या बाबतीत काही उपाय योजना जाहीर केल्या. या योजनांच्या अंतर्गत देशी उद्योगाद्वारे सरंक्षण उपकरणांची वेळेवर खरेदी करणे सुलभ होणार आहे. संरक्षण मंत्रालयाने १०१ प्रकारच्या उत्पादनांची  यादी तयार केली असून त्या वस्तूंच्या आयातीवर २०२० ते २०२४ पर्यंत बंदीही घालण्यात आली आहे.

संरक्षण मंत्रालय आता “आत्मनिभार भारत” बनण्याच्या दिशेने मोठी झेप घेण्यासाठी तयार झाले आहे. या सुधारणांमुळे संरक्षण क्षेत्राचा नक्कीच कायापालट होईल आणि संरक्षण क्षेत्र अधिक स्वावलंबी होईल, असा विश्वास आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: