क्रीडा-अर्थमत

पी. व्ही. सिंधूनं जिंकलं कांस्यपदक

टोक्यो :
ऑलिम्पिकमध्ये दिमाखात वाटचाल करणाऱ्या पी. व्ही. सिंधूचे सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले असले, तरी तिने कांस्यपदक नावावर करत इतिहास रचला आहे. आज रविवारी झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत सिंधूने चीनच्या ही बिंग जिआओचा २१-१३, २१-१५  असा पाडाव केला. याआधी मिराबाई चानुने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदकाची कमाई केली होती, त्यात आता सिंधूने भारताच्या झोळीत कांस्यपदक आणून ठेवले.

बॅडमिंटनमधील महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या ताय झू-यिंगने जगज्जेत्या सिंधूला धूळ चारली. त्यामुळे पाच वर्षांची मेहनत आणि प्रदीर्घ प्रतीक्षेनंतरही सिंधूचे ‘सुवर्णस्वप्न’ अधुरेच राहिले. रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकावर नाव कोरणारी २६ वर्षीय सिंधू यावेळी त्या पदकाचे सुवर्णामध्ये रूपांतर करेल, अशी सर्वाना आशा होती. मात्र चायनीज तैपईच्या २७ वर्षीय ताय झू-यिंगने सिंधूवर २१-१८, २१-१२ असे सरळ दोन गेममध्ये वर्चस्व गाजवले. ही लढत तिने ४० मिनिटांत जिंकली.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: