क्रीडा-अर्थमत

राहुल द्रविड टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी

मुंबई :
इंडियन प्रीमिअर लीगचं १४ वं पर्व स्थगित झाल्यानंतर भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तयारीला लागले आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया २ जूनला इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल आणि इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका, असा हा दौरा असणार आहे. सप्टेंबरपर्यंत हा दौरा चालणार असला तरी जुलै महिन्यात भारताच्या राखीव फळीचा संघ श्रीलंका दौरा करणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपद भारताचा माजी दिग्गज राहुल द्रविड याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की राहुल द्रविडचं नाव जवळपास निश्चित झालं आहे.

भारतीय संघ या दौऱ्यावर तीन वन डे व तीन ट्वेंटी -२० सामने खेळणार आहे. या कालावधीत विराट कोहली इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे श्रीलंका दौऱ्यावर संघाचं नेतृत्व कोण करेल, याची सर्वांना उत्सुकता आहे. संघातील अनुभवी शिखर धवन याचं नाव आघाडीवर असलं, तरी पृथ्वी शॉ याच्याकडेही नेतृत्व सोपवलं जाऊ शकतं. राहुल द्रविडकडे सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचं प्रमुखपद आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली अनेक युवा खेळाडू घडले आहेत आणि त्याच खेळाडूंसह टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळेच द्रविडची निवड केली गेली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: