गोवा 

‘भाजपने केले गोव्याचे भांडवलदारांच्या वसाहतीत परिवर्तन’

पणजी :

भारताचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांचे गोव्यासाठी खुप मोठे योगदान आहे. गोवा व गोमंतकीयांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने त्यांनी संघप्रदेश असलेल्या गोव्याला घटक राज्याचा दर्जा बहाल केला. परंतु, अत्यंत बेजबाबदार व असंवेदनशील भाजप सरकारने मागील नऊ वर्षात गोव्याचे परिवर्तन भांडवलदारांच्या वसाहतीत केले असे उद्गार विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी काढले.

एक वैभवशाली व समृद्ध गोवा करण्याचे स्वप्न त्यांनी बाळगले होते. परंतु, आज भाजप सरकार संपुर्ण अपयशी ठरले असुन, गोव्याच्या भवितव्यासाठी त्यांच्याकडुन चांगल्या कृतीची आता अपेक्षाच नाही. त्यामुळे २०२२ च्या विधानसभा निवडणूकांत कॉंग्रेस पक्षाचे सरकार स्थापन करुन गोव्याचा सर्वागिण विकास आपण करुया. सर्व कॉंग्रेसजनानी आता एकजुटीने कामास लागावे असे त्यांनी सांगितले.

माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी जयंती दिनी कॉंग्रेस भवनात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, खासदार फ्रांसिस सार्दिन, माजी केंद्रिय मंत्री एदूआर्द फालेरो, उपाध्यक्ष एम. के. शेख, माजी मंत्री आलेक्स सिक्वेरा व मिकी पाशेको, महिला अध्यक्ष बिना नाईक, युवक कॉंग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष आग्नेलो फर्नांडिस व इतर उपस्थित होते.

सन २०१२ मध्ये सत्तेत आलेल्या भाजप सरकारने त्यावेळी दिलेले एक ही वचन पाळलेले नाही दे दुर्देवी आहे. भाजप सरकारने पर्यावरणाचा नाश करुन गोव्याच्या अस्मितेला धक्का दिला आहे. आमची जीवनदायीनी म्हादईचा भाजपने राजकीय स्वार्थासाठी सौदा केला असे दिगंबर कामत म्हणाले.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यावर भर देत नगरपालीका व पंचायतींना अधिकार बहाल केले. देशातील प्रत्येक नागरीक व महिला स्वावलंबी व्हाव्यात हेच त्यांचे ध्येय होते. आज भाजप सरकारने देशातील सर्व लोकशाही संस्था नष्ट करुन, केवळ मोदी-शहांच्या हातात संत्तेची सर्व सुत्रे दिली आहेत असे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.

दक्षिण गोव्याचे खासदार फ्रांसिस सार्दिन यांनी यावेळी बोलताना स्व. राजीव गांधी यांनी गोव्यासाठी दिलेल्या योगदानाची आठवण केली व त्यांना आदरांजली वाहिली.

स्व. राजीव गांधीच्या दूरदृष्टीनेच आज भारत देश माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात पूढे आला असे माजी केंद्रिय मंत्री एदूआर्द फालेरो म्हणाले.

स्व. राजीव गांधीना आदरांजली वाहताना सर्व कॉंग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी पक्षाची शिस्त पाळणे गरजेचे असल्याचे सांगुन, पक्षातील अंतर्गत विषय जाहिरपणे व्यक्त न करता पक्षांतर्गत त्यावर चर्चा करुन तोडगा काढावा असे उपाध्यक्ष एम. के. शेख यांनी यावेळी बोलताना सांगितले. सर्व कॉंग्रेसजनानी आता केवळ पक्ष मजबुतीसाठी कार्य करण्यास पूढे यावे असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

आजच्या कार्यक्रमाला कॉंग्रेस नेते तुलीयो डिसोजा, विजय पै, एल्विस गोम्स, पणजीचे नगरसेवक ज्योएल आंद्राद व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.

आज सकाळी बांबोळी येथील स्व. राजीव गांधीच्या पुतळ्याला प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत, नावेलीचे आमदार लुईझीनो फालेरो, खासदार फ्रांसिस सार्दिन व इतरांनी पुष्पांजली वाहिली. विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी सर्वांनी सद्भावना दिनाची शपथ दिली.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: