गोवा 

‘त्या’ विद्यार्थ्यांसाठी मांद्रे महाविद्यालयाची विशेष योजना

पेडणे (निवृत्ती शिरोडकर) :

लोकमान्यता असलेल्या मांद्रे कॉलेज ऑफ कॉमर्सला आता सरकार आणि गोवा ​विद्यापीठाची मान्यता मिळून अनुदान सुरु झाल्याने महा​विद्यालयाचे कार्य जोमाने सुरु करू​, तसेच लवकरच उच्चविध्याविभूषित पूर्णवेळ प्राचार्याची नियुक्ती करून खोळंबलेली कामे मार्गी लावून एक आदर्श महा​विद्यालय म्हणून नावलौकिक मिळवू असा आत्मविश्वास मांद्रे कॉलेज ऑफ कॉमर्सचे चेअरमन एड.रमाकांत खलप यांनी व्यक्त  केला. ​​त्याचवेळी यावर्षी आमच्या महा​विद्यालयात प्रवेश घेणाऱ्या ​ज्या विद्यार्थ्यांचे पालक कोरोनामुळे मृत्युमुखी पडले​ आहेत, त्यांच्यासाठी विशेष योजना राबविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मांद्रे कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये बुधवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी त्यांच्यासोबत श्री सप्तेश्वर उच्चमाध्यमिक विधालायाचे जेष्ठ शिक्षक प्रा.अरुण नाईक उपस्थित होते.

यावेळी बोलताना खलप यांनी प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर मांद्रे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले .त्यामुळे आता मांद्रे सारख्या ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांचा उच्चशिक्षणाचा मार्ग खुला झाला आहे .सध्या केवळ कॉमर्स शाखा असलेल्या या महा​विद्यालयात यापुढे  कला,बीबीए,​ ​व्यावसायिक तसेच अन्य शाखा सुरु करण्यास आमचा मानस आहे​. ​एनसीसी सारख्या शाखा सुरु करून पोलीस .किवा सीमा सुरक्षा दलात भरती होण्याच्या अनुषंगाने ​विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू असे ते म्हणाले​. ​त्यासाठी सर्व आवश्यक सुविधा निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न राहील.विध्यालायाच्या कठीण काळात अनेकांनी आम्हाला सहकार्याचा हात दिला त्या विध्यार्थी ,पालक ,शिक्षक आणि आर्थिक सहकार्य करणार्यांचे आम्ही आभारी आहोत तसेच सर्वांच्या ऋणात राहू त्यांनी यापुढेही हा ज्ञान यज्ञ प्रज्वलित ठेवण्यासाठी आपले सहकार्य चालू ठेवावे असे सांगितले

यावर्षी महा​विद्यालयाची विद्यार्थी संख्या निश्चितच  वाढून २०० च्यावर जाईल तसेच आमच्या संस्थेच्या माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक ​ विद्यालयात ही विद्यार्थी संख्या वाढण्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. महाविध्यालायला या पूर्वी विरोध करणार्यांचा विरोध इतिहासजमा झाल्याचे सांगून त्यांच्या विरोधामुळेच आम्हाला कॉलेज चालू ठेवण्याची प्रेरणा मिळाली असेही ते म्हणाले आता आम्ही अगदी जोमाने काम करून लोकाश्रय आधीच असलेल्या आमच्या कॉलेजला राजाश्रय लाभल्याबद्दल शेवटी समाधान व्यक्त केले​. 
 
यावेळी प्रा.अरुण नाईक यांनी ​महाविद्यालयाच्या पडत्या काळात अनेकांनी आम्हाला सहकार्य केले .अनेकांनी सढळ हस्ते मदत केली त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.सुरवातीला पेडणे येथील श्री भगवती हायस्कूलचे संस्थापक शिक्षण प्रेमी उत्तम कोटकर तसेच कोरोनाच्या महामारीत बळी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: