सिनेनामा

आज होणार ‘सीता हरण’

रामायणा​ला कलाटणी देणारा प्रसंग ​आज 'सिया के राम'​मध्ये ​

शेमारू टीव्हीवर दररोज संध्याकाळी ७ वाजता दाखवल्या जाणाऱ्या ‘सिया के राम’ या पौराणिक मालिकेमुळे प्रभू श्रीराम व देवी सीता यांची अतिशय लोकप्रिय जीवनकथा दर्शकांना पाहायला मिळत आहे. सीतेच्या दृष्टिकोनातून सांगितली गेलेली रामायणाची गोष्ट हे या मालिकेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. आपल्या भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या आणि जगभरातील संस्कृतींवर ज्याचा गहिरा प्रभाव आढळून येतो अशा श्रीराम व सीता यांच्या कथेचा हा नवा पैलू या मालिकेमधून दर्शकांसमोर मांडला जात आहे.

या मालिकेमध्ये सध्या सुरु असले​​ल्या कथेनुसार श्रीरामांचा वनवास सुरु झाला आहे, पंचवटीच्या जंगलांमधील जीवनाशी जुळवून घेत असताना श्रीराम, सीता व लक्ष्मण यांना भोगाव्या लागत असलेल्या अडीअडचणी दाखवल्या जात आहेत. २७ ऑगस्ट रोजीच्या भागामध्ये या कथेतील असा प्रसंग पाहायला मिळणार आहे ज्यामुळे संपूर्ण रामायणाला कलाटणी मिळाली, अर्थात सीता हरण, अशी घटना जी श्रीराम आणि लंकाधिपती रावण यांच्यातील युद्धाचे कारण बनली.

रामायणाची महानता ‘सिया के राम’ मध्ये अतिशय प्रभावी पद्धतीने साकार करण्यात आली आहे.  सीता हरणाचा प्रसंग देखील खूप उत्कट पद्धतीने सादर करण्यात आला आहे, राक्षसांचा राजा रावणाला जंगलामध्ये देवी सीता दिसते, तो आपल्या कपटी वृत्तीचा वापर करून तिला पळवून लंकेला घेऊन जातो.

शुक्रवार २७ ऑगस्ट रोजी दाखवला जाणार असलेला सीता हरणाचा भाग दर्शकांसाठी अतिशय भावस्पर्शी व अविस्मरणीय ठरेल. या प्रसंगाला रामायणामध्ये खूप मोठे महत्त्व आहे, कारण यामुळेच श्रीराम आणि रावण यांच्यात युद्ध झाले व सरतेशेवटी सद्गुणांनी दुर्गुणांवर विजय मिळवला आणि रावणाचा पराभव झाला.

रामायणाच्या कथेला कलाटणी देणारा हा प्रसंग पाहण्यासाठी शेमारू टीव्हीवर शुक्रवार २७ ऑगस्ट रोजी नक्की पहा ‘सिया के राम’.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: