सातारा 

​रणजितसिंह देशमुख यांनी दिली ईदची भेट 

२५० मुस्लिम कुटुंबाना वाटले जीवनावश्यक वस्तूंचे किट 

औंध​ (अभयकुमार देशमुख) : ​
हरणाई सूतगिरणीचे संस्थापक अध्यक्ष व काँग्रेस नेते रणजितसिंह देशमुख यांनी रमजान ईदचे औचित्य साधून खटाव-माण तालुक्यातील २५० मुस्लिम कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले.​ 

खटाव तालुक्यातील औंध,वडूज,सिद्धेश्वर कुरोली,कातरखटाव यासह माण तालुक्यातील पिंगळी, दहिवडी,म्हसवडसह अन्य गावांमध्ये २५० गरजू कुटुंबाना आपली ईद आनंदात जावी यासाठी वाटप करण्यात आले. यावेळी वडुजचे माजी नगराध्यक्ष डॉ महेश गुरव,खटाव तालुका अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष दाऊद मुल्ला,टिल्लु बागवान,निलेश घार्गे- देशमुख​ ​यांची प्रमुख उपस्थिती होती. 

Ranjit Deshmukh
रणजितसिंह देशमुख

यावेळी बोलताना डॉ महेश गुरव म्हणाले की​,  रणजितसिंह देशमुख यांच्या रूपाने खटाव तालुक्यात स्वच्छ आणि सुसंस्कृत चेहरा मिळाला आहे​. ​गोरगरीब, कष्टकरी लोकांच्या चेहऱ्यावर हसू आले पाहिजे यासाठी ते प्रयत्नशील असतात, यंदा कडक उन्हाळ्यात रमजानचे रोजे आले होते,लॉकडाऊनमुळे गोरगरिबांच्या हाताला काम नाही त्यामुळे मुस्लिम समाजातील लोकांना आपली ईद उत्साहाने साजरी करता यावी यासाठी त्यांनी माण-खटाव तालुक्यातील मुस्लिम कुटुंबियांना जीवनावश्यक किटचे वाटप ​केले. 

​ईदच्या निमित्ताने अशाप्रकारे आठवण ठेवून आपल्याला ‘ईदी’ दिल्याबद्दल तालुक्यातील मुस्लिम बांधवानी रणजितसिंह देशमुख यांचे आणि पक्षकार्यकर्त्यांचे आभार मानले. 
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: