क्रीडा-अर्थमतगोवा 

‘मिल्खा सिंग भविष्यातही देत राहतील प्रेरणा’

पेडणे (प्रतिनिधी) :
क्रीडा विश्वातील आपल्या अतुल्य कामगिरीने जिवंतपणीच दंतकथा बनलेले महान धावपटू मिल्खा सिंग हे गेली सहा दशके भारतीय क्रीडापटूनचे प्रेरणास्थान होते.  त्यांची  देदीप्यमान कामगिरी भविष्यातही क्रीडापटूंना प्रेरणा देत राहील अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री तथा क्रीडामंत्री बाबू आजगावकर यांनी व्यक्त केली आहे.

goa bjp
बाबू आजगावकर

फाळणीच्या प्रसंगी कुटुंबियांच्या झालेल्या हत्येच्या दुःखाचे ओझे त्यांना पेलावे लागले. आपल्या संघर्षमय जीवनात तावून सुलाखून गेलेल्या मिल्खा सिं​​ग यांनी क्रीडामैदानावर यशाची  अनेक शिखरे सर करून देशाचे नाव उज्वल केले. 50/60 च्या दशकात मिल्खा सिंग यांनी ट्रॅक अँड फिल्डवर आपला दबदबा निर्माण केला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावरही मिल्खा सिंग यांनी चमकदार कामगिरी केली. रोम ऑलिम्पिकमध्ये त्यांचे पदक थोडक्यात हुकले तो प्रसंग आणि त्या प्रसंगाचे दुःख भारतीयांच्या मनात कायम आहे, असे आजगावकर यांनी म्हटले आहे.

प्रतिकूल परिस्थितीशी सतत झुंज द्यावी लागलेली असतानाही आपले दुःख बाजूला सारून देशासाठी महान कामगिरी केलेल्या या झुंझार क्रीडापटूचे जीवन सर्व क्रीडापटूसाठी मार्गदर्शक ठरेल असे आजगावकर यांनी म्हटले  आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: