गोवा 

‘या’ ठिकाणी मिळतील तुम्हांला रेमडेसिवीर इंजेक्शन

मुख्यमंत्री कार्यालयाने जाहीर केली यादी

पणजी :
कोविडबाधित रूग्णांवर उपचार करणार्‍या इस्पितळांकडे रेमडेसिवीर (Remdesivir) इंजेक्शनचा पुरेसा साठा नसल्याची दखल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतली असून, आपत्कालीन स्थितीत रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करण्यासाठी काही एजन्सींची नेमणूक करण्यात आलीय. या एजन्सींचे संपर्क क्रमांकही मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने घोषित केलेत.

कोविडबाधित रुग्णांवर आपत्कालीन स्थितीत प्रभावी ठरणार्‍या रेमडेसिवीर (Remdesivir) इंजेक्शनचा विषय बराच गाजला. राज्यातच नव्हे, तर देशभरात या इंजेक्शनचा तुटवडा असल्याचं दिसून आ​ले​या पार्श्वभूमीवर राज्यात रेमडेसिवीरची गरज ओळखून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या कार्यालयानं काही एजन्सींकडे रेमडेसिवीरच्या पुरवठ्याची जबाबदारी सोपवलीय. कोविडबाधित रुग्णांवर उपचार करणार्‍या इस्पितळांना रेमडेसिवीर इंजेक्शन्स पुरवण्याची जबाबदारी या एजन्सींना दिलीय. मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधून या एजन्सींची नावं आणि संपर्क क्रमांकही जाहीर करण्यात आलेत.

एजन्सी आणि त्यांचे संपर्क क्रमांक
मेसर्स सांबारी एंटरप्रायझेस, मडगाव : ​​8888612836
मसेर्स द्रोगारिया अनंता, पणजी : 9422059360
मेसर्स रायकर डिस्ट्रिब्युटर्स, मडगाव : 9579651779
मेसर्स ई. सी. एजन्सीज, मडगाव : 9689924771
मेसर्स जी. एन. एजन्सीज, म्हापसा : 8600993789
मेसर्स द्रोगारिया कोलवाळकर, म्हापसा : 9822100449
मेसर्स लिवुम फार्मा, मंगेशी : 8007001811
मेसर्स वेलनेस फॉरेव्हर लाईफस्टाईल, बांबोळी : 9766980009

दरम्यान, केंद्र सरकारकडून गोव्याला 200 ऑक्सिजन काँसंट्रेटर्स मिळाले. खास विमानानं हे काँसंट्रेटर्स गोव्यात पोहोचले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान मोदींचे यासाठी आभार मानले आहेत.​​

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: