सातारा 

रेगंडी दुर्घटना कुटुंबीयांना मुख्यमंत्री निधीतुन मदत देणार

शिवसेना माजी आमदार सदाशिव सपकाळ यांची ग्वाही

मेढा (प्रतिनिधी) :
जावली तालुक्यांतील रेंगडी वाडी येथे झालेली घटना दुर्दैवी आहे. पोटासाठी शेती करायला गेलेल्या चार शेतकऱ्यांवर काळाचा घाला पडणारी घटना आहे. दुर्घटनाग्रस्त शेतकर्याच्या कुटुबांत जावली तालुका शिवसेना सहभागी आहे. ठाकरे सरकारच्या माध्यमातुन दुर्घटनाग्रस्थ शेतकर्याना मुख्यमंत्री निधीतुन शिवसेना माजी आमदार म्हणून मी जावलीचा सुपुत्र म्हणुन मदत करणार असल्याची ग्वाही शिवसेनेचे माजी आमदार सदाशिव सपकाळ यांनी रेंगडी येथील दुर्घटना झालेल्या रेगडीवाडी येथे भेट दिल्यावर माध्यमाशी बोलताना दिली.
यावेळी ते म्हणाले की वाहुन गेलेल्या ओढ्याचे काम कोणत्या ठेकेदाराचे होते. रस्ता बाधकाम करताना नैसर्गीक ओढ्याना पाण्याचा निचरा न झाल्याने व अतिपर्जन्यमान याचा फटका रेंगडीवाडी दुर्घटनेला बसला की नाही हे पण अधिकार्यानी तपासावे अशी मागणी महसुल विभागाला माजी आमदार सदाशिव सपकाळ यांनी दिले आहे.
राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्या माध्यमातुन जावलीचा सुपुत्र म्हणुन मदत आणण्याकरीता प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्याच्याबरोबर जावली तालुक्यांतील शिवसैनिक उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: