देश-विदेश

स्थानिक समस्या तत्काळ सोडवा

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रालोआच्या खासदारांना आदेश

नवी दिल्ली : 
कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे देशात उद्भवलेल्या गंभीर स्थितीचा सर्व शासकीय यंत्रणा मुकाबला करीत आहेत. रालोआच्या सर्व खासदार व मंत्र्यांनी आपापल्या मतदारसंघातील समस्यांवर तातडीने उपाययोजना कराव्या, असा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी आज दिला. कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आज केंद्रीय मंत्रिपरिषदेची विशेष बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार तसेच राज्यमंत्री यांच्यासह वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर झालेली मंत्रिपरिषदेची ही पहिलीच बैठक होती.

खासदारांनी आपापल्या मतदारसंघातील जनतेच्या संपर्कात राहण्याची, त्यांना मदत करण्याची तसेच त्यांच्या ​​प्रतिकि‘या समजून घेण्याची सूचना मोदी यांनी केली. स्थानिक पातळीवर उद्भवणार्‍या समस्या समजून घेत त्याचे तत्काळ निराकरण करण्याचे आवाहनही त्यांनी केले. बैठकीनंतर स्वत: मोदी यांनी ही माहिती ट्विटरवर दिली. शासकीय यंत्रणांनाही खासदार व मंत्र्यांनी मदतीचा हात द्यायला हवा. समस्या कितीही गंभीर असो, ती सोडविण्यावरच आपल्या सर्वांचा भर राहायला हवा, असेह मोदी यांनी बैठकीत स्पष्ट केले.
कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित राज्यांशी समन्वय साधण्यासोबतच देशातील आरोग्य सुविधांचा विस्तार करणे, तसेच प्राणावायूचा पुरवठा वाढवण्याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. देशात कोरोनाचे नवे बाधित वाढत असताना मोदी सर्व शासकीय विभागांशी बैठका करीत आहे. मोदी यांनी नुकतीच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत, लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे आणि वायुदलप्रमुख एअरचीफ मार्शल भदौरिया यांच्याशी चर्चा केली होती. कोरोना हाताळणीत सेनादलांचे योगदान त्यांनी समजून घेतले होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: