गोवा 

‘राजीव गांधी यांचे विचार आचरणात आणण्याची गरज’

कुंकळ्ळी :
आज प्रत्येक युवक कॉंग्रेस कार्यकर्त्याने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे विचार व शिकवण आचरणात आणण्याची गरज आहे. देशातील माहिती तंत्रज्ञानाचे ते जनक होते आणि आधुनीक भारताचे शिल्पकार म्हणुन ते नहमीच स्मरणात राहतील असे कॉंग्रेस नेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे. कुंकळ्ळी गट कॉंग्रेस समितीतर्फे आयोजित माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ३० व्या पुण्यतिथी कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी आज कुंकळ्ळी गट कॉंग्रेसतर्फे सेनिटायजर, मास्क व इतर वस्तुंचे मोफत वाटप करण्यात आले. कोविडबाधित होवुन बरे झालेल्या रुग्णांच्या घरांचे सेनिटायजेशन करण्यात आले. आज सुमारे १०० घरांत सेनिटायजेशन करून देण्यात आले.

 

कोविडची महामारीचा पराभव होईपर्यंत आमचे “मानवतेसाठी समाजसेवा” हे कार्य सुरूच राहणार  असल्याचे कुंकळ्ळी गट कॉंग्रेस अध्यक्ष आसिज नोरोन्हा यांनी सांगीतले. आमचे युवा नेते युरी आलेमाव यांनी पाठिंबा दिल्यानेच आम्ही आज लोकांना मदत करु शकलो असे सांगुन, कुंकळ्ळी गट कॉंग्रेसला युरी आलेमाव यांनीच सेनिटायजर, मास्क तसेच घरे सेनिटायज करण्यासाठी सेनिटायजींग यंत्रे व मनुष्यबळ देण्याची व्यवस्था केली असे आसिज नोरोन्हा म्हणाले.

साखळीत राजीव गांधी यांना अभिवादन
sankhali congressसाखळी  काँग्रेस समितीतर्फे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी माजी आमदार प्रताप गावस, गट अध्यक्ष मंगलदास नाईक नगराध्यक्ष राय पार्सेकर, प्रावीन ब्लेगंन, राजेश सावळ, नीलकंठ गावास महादेव खांडेकर अनंत पिसुरलंकेकर  भारत गवस राजेंद्र देसाईव इतर उपस्थित होते.
डिचोलीमध्येही आदरांजली सभेचे आयोजन 
bicholim congress
आधुनिक भारताचे शिल्पकार माजी पंतप्रधान स्व राजीव गांधी यांनी देशाला दिशा देताना ग्रामीण भागात  सुविधा व आधुनिक योजना राबवण्याचा संकल्प केला होता त्यांच्या प्रेरणेमुळेच आज देशपातळीवर अनेक योजना निर्माण झाल्या असे प्रतिपादन काँग्रेस नेते नेघश्याम राऊत यानी केले. डिचोली गट काँग्रेस तर्फे  राजीव गांधी यांचे पुण्यस्मरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या वेळी आनंद नाईक गुरू हलर्णकर ,मुस्तफा बेग,जनेत झरीना ,राजेश गावकर आदी उपस्थित होते. या निमित्त काँग्रेस नेत्यांनी केशव सेवा साधना येथे सुरू केलेल्या  कोविडं  केअर सेन्टरला सॅनिटायझेर्स मास्क व आदी वस्तू प्रदान केल्या.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: