गोवा 

समुद्रकिनाऱ्यावर ‘आरजी’तर्फे वृक्षारोपण

​​पेडणे ​(प्रतिनिधी) :

आज रेव्होल्युशनरी गोवन्सच्या पेडणे गटातर्फे मांद्रे मतदारसंघात वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. आरजीनी ​सध्या ग्रीन गोवा इनिशीएटिव मोहिम सुरु केली आहे आणि त्या अंतर्गत त्यांचे सदस्य पुर्ण गोवाभर झाडे लावत आहेत.

“ग्रीन गोवा इनिशीएटिव मोहिम केरी येथे सुरू करुन, हरमल, मांद्रे आणि मोरजी येथे वृक्षारोपण करून सुमारे ५०० झाडे आम्ही लावलेली आहेत. पुढच्या रविवारी सुद्धा आम्ही पेडणे मतदारसंघात झाडे लावून आमचा गोवा हिरवा करण्याचा संकल्प पूर्ण करु”,​ आरजी ​ पेडणे तालुका प्रमुख सुनयना गावडे यांनी सांगीतले.

सरकार विकासाच्या नावाखाली आमच्या निसर्गाचा विनाश करत आहे. त्यामुळे झाडे लावणे आणि ती वाढवणे अतिशय गरजेचे आहे. त्यामुळे रिव्होल्युशनरी गोवन्स नी ठरवलंय की ते यावर्षी एक तरी झाड लावून ते वाढवती​ल, असेही त्यांनी यावेळी पुढे नमूद केले.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: