सातारा 

RFO शीतल राठोड यांच्या चौकशीचे आदेश 

 शिवसेनेच्या सचिन मोहिते यांनी केला यशस्वी पाठपुरावा 

​सातारा (​महेश पवार) :

​जिल्ह्याच्या RFO ​शीतल राठोड यांनी वृक्ष लागवड ​तसेच ​वनविभागाच्या हद्दीतील रस्तेच्या कामांच्या माध्यमातून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचे निदर्शनास ​आले होते. या संदर्भात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, उपवनसरंक्षक यांनी शीतल यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. 

​शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी या संबंधित कामांची माहिती वेळोवेळी मागणी करुन सुध्दा ​संबंधितांनी ती ​न दिल्याने ​अखेर सोमवारी सचिन मोहिते यांनी उपवनसंरक्षक यांची भेट घेतली​. यावेळी मोहिते व संबंधित कामांची माहिती वेळोवेळी मागणी करुन सुध्दा का दिली जात नाही याची विचारणा केली व जोपर्यंत माहिती मिळत नाही तोपर्यंत वन विभागाच्या कार्यालया बाहेरच बसू असा इशारा देताच , सचिन मोहिते यांनी दिलेल्या पुराव्यांच्या आधारावर नुकतेच प्रमोशन झालेल्या RFO शितल राठोड यांची चौकशी येत्या पंधरा तारखेपर्यंत करण्याचे आदेश दिले  उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी दिले.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: