सिनेनामा

कंगनाविरोधात एफआयआर दाखल 

कोलकाता :
आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावत (kangana ranaut) विरोधात आता प.बंगालच्या उल्टाडांगा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कंगना रनौत हिच्याविरूद्ध द्वेषयुक्त भाषण दिल्याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली आहे. द्वेषयुक्त भाषण दिल्याबद्दल तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते रिजू दत्ता यांनी हि तक्रार दाखल केली आहे.
kangana ranautरिजू यांनी आपल्या एफआयआरची एक प्रत ट्विटरवरही शेअर केली आहे. तक्रारीची कॉपी शेअर करण्याबरोबरच त्यांनी लिहिले की, “मी कंगना रनौत यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे. कारण ती बंगालमध्ये जातीय हिंसा भडकवण्याबद्दल द्वेष पसरवत आहे आणि त्याचवेळी ममता बॅनर्जी यांची प्रतिमा खराब करत आहे.” रिजू यांनी तक्रारीतही कंगना रनौत यांच्यावर कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: