गोवा 

”हा’ तर मतदारांचा अपमान’

पणजी :
भाजपमध्ये प्रवेश करणारे हे सगळे घोटाळेबाज आहेत, या पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांच्या वक्तव्याला भाजपने तीव्र हरकत घेतली आहे. भाजपने आपल्या प्रसिद्धी पत्रकातून आमदार खंवटे यांच्यावर निशाणा साधला आहे. खंवटे यांनी लोकप्रतिनिधींना घोटाळेबाज संबोधणे हा मतदारांचा अपमान असल्याचे भाजपने म्हटले आहे.

खंवटे यांची पर्वरी मतदारसंघावरील पकड सैल होत असून ग्रामपंचायती त्यांची साथ सोडून डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या विकासाकडे वळू लागल्या आहेत. पर्वरीच्या जनतेला भाजप म्हणजे विकास हे समजले आहे. पर्वरीवासीय विकासाचा पुरस्कार करत आहेत.

goa
रोहन खंवटे

भाजप लोकप्रतिनिधींचा आदर करते कारण ते जनतेचे खरेखुरे प्रतिनिधीत्व करत असतात. त्यामुळे भाजपमध्ये त्यांचे स्वागत केले जाते आणि राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या प्रक्रीयेत सामावून घेतले जाते. पर्वरी विधानसभा मतदारसंघात आता भाजपचाच विजय होईल. भाजपच्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्य देताना सध्याच्या अकार्यक्षम आमदाराला लोक घरी पाठवतील, असा दावाही भाजपने केला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: