सातारा 

सह्याद्रिचा दुसरा हप्ता बँक खात्यात जमा

कराड (अभयकुमार देशमुख) :
सह्याद्री सहकारी साखर कारखाना लिमिटेड यशवंतनगर, ता. कराड कारखान्याने सन 2020-21गळीत हंगामात गळीतास आलेल्या ऊसाच्या दुसऱ्या हप्त्यापोटी प्रति टनास 150/- रुपयांचा दुसरा हप्ता ऊस उत्पादक सभासदांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आला असल्याचे एसएमएस मोबाईलवर येऊ लागले असून, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे कामकाज सुरू असून कारखाना सभासदांच्या हितासाठी सदैव कार्यरत आहे. या कारखान्याने, कारखान्याचे संस्थापक आदरणीय पी डी पाटीलसाहेब यांनी घालून दिलेल्या आदर्शाप्रमाने सभासदांच्या ऊसाला योग्य व रास्त भाव देण्याची परंपरा सुरू ठेवली असून, सन 2020-21 गळीत हंगामामध्ये गळीतास आलेल्या ऊसाच्या दुसऱ्या हप्त्यापोटी प्रतिटनास 150/- रुपये ऊस उत्पादक सभासदांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केले आहेत.

सध्या मान्सून पूर्व शेतीच्या मशागतीची सर्व कामे पूर्ण झाली असून पेरणीची लगबगही सुरू झाली आहे,  आशा योग्य वेळी सह्याद्रि कारखान्याने ऊस बिलाचा दुसरा हप्ता प्रतिटनास 150/- ने दिला असल्याने,  शेतीसाठी खते, औषधे, बी-बियाणे आदिसाठी त्याचा उपयोग होणार आहे.

यापूर्वी कारखान्याने पहिल्या हप्त्यापोटी प्रतिटनास 2651/- रुपये अदा केले आहेत. सदरचा दुसरा हप्ता 150/- ने जमा झाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: