सातारा 

२४ पासून सुरू होणार ‘सह्याद्री’चा गळीत हंगाम

कराड (अभयकुमार देशमुख) :


 सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या सन 2021-22 सालातील 48 व्या गळीत हंगामाचा शुभमुहूर्त समारंभ कारखान्याचे जेष्ठ संचालक मा.श्री सुरेशराव नानासाहेब माने (बापू) यांच्या शुभहस्ते व कारखान्याचे चेअरमन, राज्याचे सहकार व पणन मंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि संचालक मंडळाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रविवार दिनांक 24 ऑक्टोबर, 2021 रोजी दुपारी 12.15 वाजता संपन्न होणार आहे. तसेच कारखान्याची सन 2020-21 सालामधील 51 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दुपारी 2.00 वाजता, कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्याने ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने कारखान्याच्या मुख्य ऑफिस इमारतीसमोरील मंडपात होणार असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी दिली.

आबासाहेब पाटील पुढे म्हणाले की, कारखान्याची सन 2020-21 सालामधील 51 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे नियोजन करण्यात आलेले होते, तथापि कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे राज्य शासनाने सभा, संम्मेलने, जाहिर कार्यक्रमांच्या उपस्थितीबाबतचे निर्बंध शिथील केलेले आहेत, या पार्श्‍वभूमीवर कारखान्याची 51 वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. ज्या सभासदांना सभेमध्ये ऑनलाईन सहभाग घ्यावयाचा आहे, त्यांनी आपले नांव, अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल नंबर, संबंधीत विभागीय शेती गट कार्यालयामध्ये नोंदवावे, म्हणजे त्यांना सभेची लिंक पाठविणे सोयीचे होईल.

येत्या सन 2021-22 हंगामाची मशिनरी ओव्हर हॉलींगची कामे पूर्णत्वास आलेली आहेत. मजूर परिसरामध्ये मागील आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे मजूरांना कारखाना कार्यस्थळावर येण्यास चार/पांच दिवसांचा विलंब झालेला आहे. येत्या काही दिवसांत मजूर कारखाना कार्यस्थळावर दाखल होण्यास सुरूवात होणार आहे.
      

कोरोनाचा संसर्ग अजूनही पुर्णतः संपलेला नसल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सदर समारंभास व सभेस येताना मास्कचा वापर करावा. सदर समारंभास व वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी सभासदांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कारखाना व्यवस्थापनाच्यावतीने कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: