सातारा 

‘सह्याद्री’च्या नव्या हंगामाचे मिल रोलर पूजन संपन्न

सातारा (अभयकुमार देशमुख) :
सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या सन 2021-22 हंगामासाठी मिल रोलर पुजन समारंभ कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून कारखान्याचे संचालक दत्तात्रय बाबुराव जाधव, वसंतराव कणसे, मानसिंगराव जगदाळे, कांतीलाल पाटील व युवा संचालक जशराज पाटील (बाबा) यांच्या शुभहस्ते विधीवत पुजा करून व सर्व संचालकांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले.
कारखान्याचा गळीत हंगाम वेळेत सुरू करण्यासाठी कारखान्यातील मशिनरींची ओव्हर हॉलिंगची कामे सुरू असून ती प्रगतीपथावर आहेत.

जात निहाय व हंगाम निहाय ऊस लागण कार्यक्रमानुसार शिफारशीत असणार्‍या ऊस वाणांची लागण करणार्‍या सभासद- शेतकर्‍यांना कारखान्याकडून मुख्य अन्न द्रव्य, सुक्ष्म अन्न द्रव्य द्रवरूप खत, हिरवळीच्या खतासाठी ताग बियाणेे, सह्याद्रि समृध्द सेंद्रिय खत, व्ही. एस. आय ने तयार केलेले हुमणी किडनाशक, वसंत उर्जा, ट्रायकोडर्मा, जैविक जीवाणू खते आदिंचा पुरवठा करण्यात येत असून, शासनाच्या सुक्ष्म सिंचन धोरणानुसार ठिबक सिंचन संच बसविण्यासाठी कारखान्याकडून योग्य ते मार्गदर्शन व सुविधा पुरविण्यात येत आहे, त्याचा लाभ सभासद शेतकर्‍यांनी घ्यावा व अधिक माहितीसाठी कारखान्याच्या संबंधीत विभागीय शेती कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन कारखाना व्यवस्थापनाकडून करण्यात येत आहे.

याप्रसंगी कारखान्याच्या व्हाईस चेअरमन सौ.लक्ष्मीताई गायकवाड, कारखान्याचे संचालक व सातारा जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, कारखान्याचे संचालक सर्वश्री सुरेशराव माने, डी.बी.जाधव, माणिकराव पाटील, कांतीलाल पाटील, जशराज पाटील (बाबा), वसंतराव कणसे, अविनाश माने, लालासाहेब पाटील, संजय थोरात, रामचंद्र पाटील, बजरंग पवार, सर्जेराव खंडाईत, रामदास पवार, संंतोष घार्गे, पांडुरंग चव्हाण, जयवंत थोरात, लहुराज जाधव, संजय कुंभार, सौ.शारदा पाटील, कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, कारखान्याचे सभासद, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: