सिनेनामा

सलमान भाईंनी आणलेली एक नवीन महामारी!

– शितल  ​जांबोटकर – खोकले 

 

सुरुवात कुठून करावी?
काय लिहावं?
कोणाबद्दल लिहावं?
कशासाठी लिहावं?सलमान भाई उर्फ राधे पोलिस खात्यात कोणत्यातरी पदावर परत येतात.
त्यांना एक काम सोपवण्यात येतं.
मग भाऊ टपोरींचा वेष परिधान करून कामाला लागतात.
कार्यालयातही तोच टपोरी वेष.
मनात आलं तेव्हा पोलिस होतात.
मनात आलं तेव्हा रोमिओ होतात.
मनात आलं तेव्हा नाचगाणं करतात.
आपल्याला हसवण्याचा अटोकाट प्रयत्न करतात.
पण कुठेच यशस्वी होत नाहीत.
काच हा त्यांचा आवडता विषय.
ते दार किंवा खिडकी काढून कधीच येत नाहीत.
काचेचा चुराडा करूनच ते आत प्रवेश करतात.त्यांच्या जोडीला दिशा पटानी आहेत.
सलमान जिथे जिथे जातो तिथे त्या पोहोचतात.
अभिनयाच्या बाबतीत तर दोघेही माशा अल्लाह!सगळ्यात मोठा गुंड म्हणून आपल्याला रणदीप हुडा दिसतात राणाच्या भूमिकेत.
रणदीप हुडाने चांगला अभिनय केलाय पण त्या रोलमध्ये काही करण्यासाठी भाईंनी ठेवलंच नाही त्यांच्यासाठी.

कॅमेरा या राणावरून थोडासाही हटला की हा राणा गायब होतो.
पोलिसही त्याला शोधण्याच्या भानगडीत पडत नाहीत.
पुन्हा येईल तेव्हा पाहता येईल.
हे पटलं आपल्याला.

अजून एक दोन गुंड आहेत त्यांना बिगबॉस रोजगार हमी योजनेअंतर्गत यात काम मिळालय.
जॅकी श्रॉफ सारखा अभिनेता यात पाहताना खूप त्रास होतो.
त्यांना करायला लावलेला अभिनय पाहताना कोरोना परवडला असा भास होतो.

प्रविण तरडेंचा थोडा रोल आहे पण तो का आहे आणि प्रविण तरडेंनी त्यात काय केलंय कदाचित त्यांनाही समजलं नसेल.
सिद्धार्थ जाधवला यात का रोल दिला समजलं नाही.
दोन सीनमध्ये तो येतो.
दोन्ही सीनमध्ये तो हसवून मात्र जातो.
पण तो हॉटेलचा मालक असून बंदूक घेऊन मारायला का जातो हे प्रभू देवा कधी सापडला तर मी त्याला थांबवून विचारणार आहे.

सिनेमा का बनवला?
यात काय दाखवायचय हे कदाचित ते स्वतःच विसरलेत.
एका सीनमध्ये तर रणदीप हुडा जो स्वतः राणा आहे तो
कॉलवर ‘राणा उद्या हेलिकॉप्टर घेऊन ये’ म्हणतोय.
कदाचित मी लस घेतल्यामुळे माझाच काहीतरी गोंधळ होतोय असं समजून हे सगळं मी मोठ्या मनाने स्विकारलं.

पण खरं सांगतो, लस घेतल्यावर पहिल्या दिवशी बराच ताप आला होता.
तो आज कमी झाला आणि लगेच हे प्रकरण मी पाहिलं.
परत ताप आला आणि आता पॅरासिटॅमॉल घेऊन मी झोपणार आहे.

दोष सिनेमाचा नाही.
दोष लसीचा आहे असं म्हणून मी स्वतःची समजूत काढतोय.

सिनेमा पाहा पण दुसरी महामारी सहन करण्याची ताकद असेल तरच.

प्रभूदेवा आणि सलमान दादांना दंडवत 🙏🙏

radhe
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: