सिनेनामा

‘सम्राट अशोक’ करणार संविधानाच्या मूलभूत तत्वांचे संरक्षण 

– मंजुल भारद्वाज

26 जानेवारी, 1950 रोजी संविधानाचा अवलंब करून, भारत एक सार्वभौम राष्ट्र म्हणून उदयास आला. जगाने भारताच्या सार्वभौमिकतेला सलाम केले. भारतात प्रथमच जनतेला देशाचा मालक होण्याचा संविधानात्मक हक्क मिळाला. संविधान म्हणजे सम+विधान म्हणजे सर्वांना समानतेचा अधिकार मिळाला. संविधानात सर्वांना समान हक्क देऊन भारत मनुस्मृतीच्या शापापासून प्रशासकीयदृष्ट्या मुक्त झाला. संविधानाच्या बळावर रंगभेद, शोषण, अन्याय, हिंसाचाराच्या क्रूर अत्याचारापासून मुक्तता आणि मानव अधिकाराच्या नव्या युगात भारताने प्रवेश केला.

समाजातील विविध असमानतेविरुद्ध सरकारने लढा दिला आणि एक ‘मानवीय आणि सहिष्णु’ समाज घडविण्यासाठी कार्य केले. विकारी संघाच्या धर्म आधारित विध्वंसक षडयंत्रला पसरण्यापासून रोखले आणि गांधींच्या हत्येनंतर अनेक दशकांपर्यंत सर्वधर्म समभाव च्या राजनैतिक जमिनीखाली पुरून टाकले ! भारतीय संविधानाच्या निर्मात्यांनी अशोक स्तंभाला  आपल्या शासनाची ‘राजमुद्रा’ बनविले. सम्राट अशोकच्या सर्वधर्म समभाव नीतीला भारतीय संविधानाचा आत्मा म्हणून स्वीकारले आणि कोणत्याही धर्माचे बहुलत्व नाकारले.

भारतातील मूलभूत तत्व ‘लोककल्याण आणि धर्मनिरपेक्षता’ सम्राट अशोकाच्या नितींमधून घेतलेले तत्व आहेत.  सम्राट अशोकाने भारताला दिलेला हा वारसा आहे, ज्याच्या पायावर आजचा स्वतंत्र भारत उभा आहे.

1990 च्या जागतिकीकरणाच्या विध्वंसक काळाने केवळ जगाचा नाश नाही केला तर भारतीय संविधानातील मूलभूत तत्वांनाही आव्हान दिले. भारतातील आर्थिक भरभराटीतून जन्माला आलेल्या नवीन मध्यमवर्गाने लोभाच्या घोडयावर स्वार होऊन विकारी संघाच्या विकासाच्या जाळ्यात फसून त्यांना देशाच्या सत्तेवर बसविले. आज संख्याबळाच्या जोरावर विकारी संघ भारताला  ‘हिंदू राष्ट्र’ बनविण्यासाठी आस्थेच्या चितेत संविधानाचे दहन करीत आहे. विकारी संघ ‘मनुस्मृती’ ला मूळ प्रशासन ग्रंथ बनवू इच्छित आहे. वर्णवादाला पुनरुज्जीवित करत आहेत. धार्मिक कट्टरतावाद, जातीवाद आणि हिंसाचार आज शिगेवर पोहचले आहेत. सरकार आपल्या अहंकाराने जनतेच्या अधिकारांना चिरडून लोकशाहीला कलंकित करीत आहे.

कोणत्याही किंमतीवर निवडणुका जिंकणे हे एक मोठा नेता असल्याचे प्रमाणपत्र बनले आहे. अशा आव्हानात्मक काळात नाटककार धनंजय कुमार यांनी विकारवादाशी एकहात करण्यासाठी सम्राट अशोकाला इतिहासाच्या पानांमधून सम्राट अशोकाला बाहेर काढून आमच्या समोर नाटकाच्या रूपात जिवंत केले. ‘सम्राट अशोक’ हे नाटक कलिंग विजयानंतर अशोकमध्ये झालेल्या मुळगामी परिवर्तनाची गाथा आहे. हिंसक अशोकाचा अहिंसक होण्याचा प्रवास आहे. लालसाग्रस्त, एकाधिकारवादी अशोकाने लोकशाही मूल्यांना आपलंसं करण्याचा एल्गार आहे. ‘प्रजा कल्याण हा शासनाचा मूळ आधार असावा’ हा उद्घोष आहे.

12 ऑगस्ट 2021 रोजी “थिएटर ऑफ रेलेवन्स” च्या सुत्रपात दिनानिमित्त “सम्राट अशोक” नाटकाची प्रथम प्रस्तुती होणार आहे! निवडक प्रेक्षकांसाठी शासनाचे निर्बंध पाळून हा खाजगी प्रयोग सादर होणार आहे.  रंगचिंतक मंजुल भारद्वाज अभिनित आणि दिग्दर्शित धनंजय कुमार यांच्या कालजयी नाट्यरचनेला आपल्या कलात्मकतेने साकारणार आहेत,अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर, सुरेखा साळुंखे आणि इतर कलाकार !

परिवर्तनाला उत्प्रेरीत करत मागील 29 वर्षांपासून ” थिएटर ऑफ रेलेवन्स” नाट्य सिद्धांताने सतत सरकारी, नीम सरकारी, कॉर्पोरेटफंडिंग किंवा कोणत्याही देशीविदेशी अनुदाना शिवाय आपली प्रासंगिकता आणि आपली मूल्य व कलात्मकतेच्या संवाद स्पंदनांनी मानवतेची गाज असणाऱ्या या जनमंचाने जागतिक रूप धारण केले आहे. सरकारच्या 300 ते 1000 करोडच्या अनुमानित संस्कृति संवर्धन बजेटच्या विरुद्ध प्रेक्षक सहभागितेने उभे आहे हे रंग आंदोलन … मुंबई पासून मणिपूर पर्यंत!

थिएटर ऑफ रेलेवन्स ने जीवनाला नाटकाशी जोडून “मागील 29 वर्षांपासून सांप्रदायिक मुद्द्यावर ‘दूर से किसी ने आवाज़ दी’, बाल मजुरी वर ‘मेरा बचपन’, घरगुती हिंसेवर ‘द्वंद्व’, आपल्या अस्तित्वाचा शोध घेत अर्ध्या लोकसंख्येचा आवाज ‘मैं औरत हूँ’ , ‘लिंगनिदान’ या विषयावर नाटक ‘लाडली’ , जैविक आणि भौगोलिक विविधतेवर “बी-७” , मानवता आणि निसर्गाच्या प्राकृतिक संसाधनांच्या खासगीकरणाच्या विरोधात “ड्राप बाय ड्राप : वॉटर”, मनुष्याला मनुष्य बनून राहण्यासाठी “गर्भ” , शेतकऱ्यांची  आत्महत्या आणि शेतीच्या होणाऱ्या विनाशावर ‘किसानों का संघर्ष’ , कलाकारांना कठपुतली बनवणाऱ्या आर्थिक तंत्रापासून कलाकारांच्या उन्मुक्ततेसाठी नाटक “अनहद नाद-अन हर्ड साउंड्स ऑफ़ युनिवर्स” , शोषण आणि दमनकारी पितृसत्ततेच्या विरुद्ध न्याय, समता आणि समानतेची हुंकार “न्याय के भंवर में भंवरी” , समाजात राजनैतिक चेतना जागवण्यासाठी ‘राजगति’, समतेचा एल्गार “लोकशास्त्र सावित्री” नाटकांच्या माध्यमातून फॅसिस्टवादी ताकदींशी लढत आहे !

कला नेहमी परिवर्तनाला उत्प्रेरीत करते. कारण कला मनुष्याला मनुष्य बनवते. जेव्हा विकार मनुष्याच्या आत्महीनतेमध्ये झिरपू लागतो तेव्हा त्याच्या आत  समाविष्ट असलेला कला भाव त्याला चेतावणी देतो. थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांत अपल्या रंग आंदोलनातून मागील 29 वर्षांपासून देशात आणि जगभरात आपल्या कलात्मक प्रतिबद्धतेने हे सचेतन कलात्मक कर्म करत आहे.

गांधींच्या विवेकाच्या राजनैतिक मातीत विचारांचे रोपटे रुजवित, थिएटर ऑफ रेलेवन्सचे प्रतिबद्ध कलाकार समाजातील फ्रोजन स्टेटला तोडून सांस्कृतिक चेतना जागृत करीत आहेत.आज या प्रलयकाळात थिएटर ऑफ रेलेवन्स ‘सांस्कृतिक सृजनकार’ घडवण्याचा विडा उचलत आहे! सत्य – असत्याच्या भानाच्या पुढे जाऊन निरंतर खोटे पसरवून देशाची सत्ता आणि समाजाच्या मानसिकतेवर कब्जा करणाऱ्या विकारी परिवारापासून आज केवळ सांस्कृतिक सृजनकार मुक्ति देऊ शकतात. काळाची गाज सांस्कृतिक सृजनकार !!

भारतीय संविधानातील मूलभूत तत्वांचे संरक्षण करण्याचा संकल्प करून प्रस्तुत करीत आहोत,धनंजय कुमार यांची कालातीत नाट्य रचना ‘सम्राट अशोक’ !!!
(थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिध्दांताचे सुत्रपात रंगचिंतक  मंजुल भारद्वाज यांनी 12 ऑगस्ट 1992 साली केले होते. 2021 मध्ये थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिध्दांताला 29 वर्षे पूर्ण होत आहेत.)
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: