महाराष्ट्र

मराठा आरक्षणावरून खा. संभाजी राजे आक्रमक

 नांदेड  (अभयकुमार देशमुख) :
 मराठा आरक्षणावरून खासदार संभाजी छत्रपती आक्रमक झाले आहेत. त्यांनी पहिल्यांदाच थेट राज्य आणि केंद्र सरकारला आव्हान दिलं आहे. मराठा आरक्षणावर चर्चा करण्याची माझी तयारी आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या लोकांनी बसावं माझ्यासमोर, होऊन जाऊ द्या चर्चा, असं आव्हानच खासदार संभाजी छत्रपती यांनी दिलं आहे.

आज नांदेडमध्ये मराठा समाजाचा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चाला संबोधित करताना संभाजी छत्रपती यांनी हे आव्हान दिलं. केंद्राने 127 वी घटना दुरुस्ती केली आहे. राज्याला ओबीसी प्रवर्ग ठरविण्याचे अधिकार दिल्याचं केंद्राने सांगितलं. आरक्षण देण्याचे अधिकार दिले. पण आरक्षण द्यायचं कुठून? इंदिरा सहानी केसने हात बांधले आहेत. त्याला एकच पर्याय आहे, आरक्षण द्यायचं असेल तर तुम्ही घटना दुरुस्ती केली पाहिजे. केंद्राने केंद्राची जबाबदारी पार पाडावी. त्यांनी दुरुस्ती करावी. दूरवर आणि दुर्गम हा बदल करून भौगोलिक परिस्थितीचा मुद्दा टाकावा. नाही तर मग 50 टक्क्यांची कॅप बदला. तर राज्याने मराठा समाजाला मागास घोषित केलं पाहिजे. ही केंद्र आणि राज्याची जबाबदारी आहे. त्यावर बोला. वन टू वन चर्चा करायला मी तयार आहे. बोलवा सर्वांना. मराठा समाजाच्यावतीने मी बोलेन. मी वकील नाही. पण माझी भाषा वकिलासारखी आहे. केंद्र आणि राज्याचे लोकं येऊ द्या. मी समोर बसतो. होऊ द्या चर्चा, असं आव्हान संभाजी छत्रपती यांनी दिलं.

तुम्ही काय भांडता याचं आम्हाला घेणं देणं नाही. समाजाला टिकणारं आरक्षण कसं देता याच्याशी आम्हाला घेणं आहे. मराठा समाजाचं आरक्षण रद्द केल्यानंतर तुम्ही पुनर्विचार याचिका दाखल केली. त्यानंतर तुम्ही काय पाठपुरावा केला ते मला सांगा. काहीच पाठपुरावा केला नाही. राज्य सरकारने सांगावं मला मी त्यांच्यासोबत जायला तयार आहे, असं आव्हानच त्यांनी दिलं.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: