कला-साहित्य

सम्राट क्लब पेडणे टाऊनच्यावतीने निबंध स्पर्धा

पेडणे (प्रतिनिधी) :
सम्राट क्लब पेडणे टाऊन तर्फे पेडणे बार्देज मर्यादित मराठी निबंध स्पर्धा  पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी अशा दोन गटात आयोजित करण्यात आली आहे .

मराठी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . पाचवी ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी माझा गोवा , तर आठवी ते दहावी गट साठी गोव्यासाठी मी काय करीन किंवा गोव्यासाठी माझे योगदान काय असेल या विषयावर निबंध लेखन करायचे आहेत .

निबंध शब्द मर्यादा ५०० ते ७०० शब्द , निबंध पाठवण्याची अंतिम तारीख ३० जून पर्यंत असेल . स्पर्धकांनी आपले पूर्ण नाव ,शाळेचे नाव, संपर्क क्रमांक लिहून ९०११०९१०४० या व्हाटअस्प  क्रमांकावर पीडीएफ कॉपी पाठवावी .

पहिल्या गटासाठी प्रथम बक्षीस १००० ७५० व ५०० तर प्रत्येकी ३०० रुपयांची दोन उत्तेजनार्थ बक्षिसे दिली जातील . तर मोठ्या गटासाठी प्रथम १५०० , १००० , ७५० व ५०० रुपयांची प्रत्येकी दोन उत्तेजनार्थ बक्षिसे दिली जाईल . अधिक माहितीसाठी सम्राट व्यंकटेश नाईक [ ७७४५०३७११८ ] , सम्राट  पुंडलिक पंडित , सम्राट  प्रिया टांगसाळी व सम्राट  रिषभ कोलवेकर असे आयोजकांनी कळवले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: