गोवा 

साखळीत टीका उत्सवास प्रतिसाद

डिचोली (प्रतिनिधी) :
साखळी मतदारसंघातील कुडणे,आमोणा, हरवळे पंचायत विभागात टीका उत्सवाला उत्तम प्रतिसाद लाभला. सुमारे १७६ लोकांनी कोविड लस घेतली असून आज रविवारी न्हावेली येथे लसीकरण आयोजित करण्यात आल्याची माहिती मंडळ अध्यक्ष गोपाळ सुर्लकर यांनी दिली.

लोकांनी लवकरात लवकर लस घेऊन सुरक्षित राहावे मतदारसंघातून १०० टक्के लसीकरण यशस्वी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी केले असून त्याला सर्वानी सहकार्य करावे असे आवाहन गोपाळ सुर्लकर सरपंच महेंद्र एकावडे सुभाष मळीक आदींनी केले आहे. यावेळी दिनेश गुरव, वीरेंद्र एकावडे, सुरेश कामत आदी उपस्थित होते. सर्व पंचायत विभागात सरपंच पंच तसेच भाजप कार्यकर्ते टीका उत्सवासाठी कार्यरत आहेत असे सांगण्यात आले.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: