गोवा 

‘सोहिरोबानाथ… ज्ञानदीप मार्ग’ फलकाची दुर्दशा

पणजी (विशेष प्रतिनिधी) :

‘…अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे’ अशी शिकवण देणाऱ्या संत सोहिरोबानाथ आंबिये यांची स्मृती कायम रहावी यासाठी बांबोळी ते दोनापावला या नव्या चौपदरी मार्गाचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ‘संत सोहिरोबानाथ आंबिये ज्ञानदीप मार्ग’ असे नामकरण केले होते. तसा नामफलकदेखील तिथे लावण्यात आला होता. पण गेल्या काही दिवसांपासून सदर नामफलक गायबच झाला असून हा नामफलक आता दोनापावलाच्या बार आणि रेस्टॉरंटमध्ये अडगळीच्या ठिकाणी दिसतो​​ आहे.

संत सोहिरोबानाथ आंबिये यांचा गोव्याला विशेष अभिमान. २०१५ साली त्यांची त्रिशताब्दी जयंती राज्यभरात थाटात साजरी करण्यात आली. त्यांचे कित्येक अभंग आजही घराघरात गायले जातात. ‘हरिभजनाविना काळ घालवू नको रे…’ या अभंगामुळे ते सर्वार्थाने अजरामर झाले. त्यांचे स्मरण सदोदित राहावे यासाठी गोवा विद्यापीठ असलेल्या बांबोळी- दोनापावला या नव्या चौपदरी मार्गाला काही वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी  ‘संत सोहिरोबानाथ आंबिये ज्ञानदीप मार्ग’ असे नाव दिले होते. तसा नामफलक दोनपावला चौकातील जॅक सिक्वेरा यांच्या पुतळ्याजवळ तसेच मार्गावरही विविध ठिकाणी लावले होते. पण गेल्या काही दिवसांपासून जॅक सिक्वेरा यांच्या पुतळ्याजवळील ‘संत सोहिरोबानाथ आंबिये ज्ञानदीप मार्ग’ हा फलक आपल्या जागेवर नव्हता. काही दिवसांनी असा काही फलक तिथे होता हेच कित्येकांना कळले नाही. पण गेल्या काही दिवसात या चौकात असलेल्या एका बार आणि रेस्तराँच्या आवारात रस्त्याच्या सदर फलक काही सजग नागरिकांना दृष्टीला पडला.

असे असले तरी सरकारदरबारी मात्र या रस्त्याचा नामफलक होता आणि त्यानंतर तो तिथून कोणा समाजकंटकाने हटवून सदर फलक अन्यत्र फेकून दिला याबद्दल काहीच सोयरसुतक नाही असेच​ दिसते आहे. ​
goa road
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: