सातारा 

सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मंत्र्यांची भेट 

सातारा (महेश पवार) :
सरपंच परिषदेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी आज मंत्रालयामध्ये विविध मंत्र्यांची भेट घेऊन त्यांना विविध प्रश्नांबद्दल अवगत करत, निवेदने देण्यात आली.
 
काल रात्री उशीरा झालेल्या  बैठकीमध्ये सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासमवेत वीज प्रश्नाबाबत तसेच सरपंच यांच्या विविध प्रश्नांविषयी चर्चा करण्यात आली. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार ,ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ तसेच ,ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याबरोबर संयुक्त मिटींगचे नियोजन करण्यात आले. यावेळी सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र पदाधिकार सातारा जिल्हाध्यक्ष नितीन पाटील, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष समाधान पोफळे, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस संजय शेलार, विश्वस्त कार्याध्यक्ष सातारा जिल्हा आनंदराव जाधव  जिल्हा उपाध्यक्ष अरुण भाऊ कापसे जिल्हा सरचिटणीस शत्रुघ्न धनवडे आदी उपस्थित होते.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: