सातारा 

शेतकऱ्यांच्या बँकेवर जाण्यासाठी आमदार – मंत्र्यांची चढाओढ

सातारा (महेश पवार) :

जिल्ह्याची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूकीचे आज मतदान होत आहे . २१ जागा असून यातील ११जागा बिनविरोध झाल्यानं १० जागांसाठी निवडणूक होत आहे.


पण या निवडणुकीत सुरू असलेल्या नाट्यमय प्रकारामुळे , बॅक शेतकर्यांची पण आमदार, खासदार , मंत्री यांनीच गुडघ्याला बाशिंग बांधल्याने बॅंकेच्या निवडणुकीत सर्व सामान्य शेतकरी दिसेना पण घराणेशाही, राजेशाही,तर दिसतं तर हुकुमशाही होत असल्याची शेतकरी वर्गात चर्चा सुरू आहे . तर जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाची मोहर शशिकांत शिंदे यांना मिळू नये , म्हणून कंबर कसून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी त्यांचे कार्यकर्ते रांजणे पुढं करून अंतर्गत कुरघोड्या सुरू केल्यानं जिल्ह्यात राजकीय घमासान पहायला मिळते.नक्की कुठे कोण कुणाला कमी नाही हे पाहु शकता. जिल्ह्यातील जावली तालुक्यातील मतदारांनी आमचं ठरलं म्हणत बॅंकेवर फक्त मतदार म्हणतील तोच उमेदवार बंडखोरी होताना दिसली पण ती एकमेकांची जिरवण्यासाठी दिलेला उमेदवार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

कराड तालुक्यातुन दस्तुरखुद्द सहकारमंत्री उमेदवार असून धोका असताना देखील बॅंकेवर मिच जाणार कारण सामान्य कार्यकर्ता किंवा शेतकरी यांच्यावर विश्वास नसल्याने उमेदवारी दिल्याचं चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे ?

वाई तालुक्यातील देखील तशीच परिस्थिती आहे कारण या परिसरात सर्व सामान्य शेतकरी कार्यकर्ताच नसल्याने दोन भावांनी बॅकेवर बिनविरोध निवडणूक जिंकली असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे .

फलटण तालुक्यात देखील पहिला मान घराणेशाही व राजेशाही यांनाच असतो यामुळे एकाही शेतकर्यांनी हुकुमशाही असल्याने पुढं येण्याचं धारिष्ट्य केले नाही का ?

पाटण तालुक्यातील चित्र सुध्दा तसेच आहे पिता पुत्रांची अनेक वर्षे घराणेशाही असल्याने जिथं गृह खात्याच्या मंत्र्यांना घाईला आणलं तिथं सर्व सामान्य शेतकरी कसा निवडून येणार असं चित्र सध्यातरी दिसते.

सातारा तालुका म्हणजे आम्ही दोघे भाऊ भाऊ भांड भांड भांडू पण अन् ऐन वेळी बिनविरोध दोघेच बॅकेत जाऊ अशी परिस्थिती असून इथे जरी शेतकरी तुम्ही असला तरी त्या शेतीवरच नव्हं तर सगळ्यांवर राजेशाही ची मोहर असल्याचे दाखवले जाते अशी परिस्थिती सध्या तरी जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात व सर्व सामान्य शेतकरी वर्गात चर्चा सुरू आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: