सातारा 

‘राष्ट्रमत’चा दणका ; जिल्हा बॅंकेला सोसायटी घोटाळ्यावरून ‘नाबार्ड’ची नोटीस

सातारा (महेश पवार) :

जिल्हा बॅंकेच्या नियंत्रणाखाली असलेल्या केडर मधील सचिव बजरंग केंजळे हा केडर घोटाळ्यामधील वाजे या सचिवावर कारवाई चे आदेश असतानाही कारवाई न केल्याने नाबार्ड ची जिल्हा बॅंकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना नोटीस वजा कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

कण्हेरखेडच्या विकास सेवा सोसायटीच्या भ्रष्ट कारभार्यावर जिल्हा डिस्ट्रिक्ट सुपरवव्हिजनचे कार्यकारी प्रमुख राजेंद्र सरकाळे कारवाई चे आदेश असतानाही कारवाई न करता ,जिल्हा बँक संचालक मंडळाची दिशाभूल वजा फसवणूक का करत आहेत?या संदर्भात गेले दोन महिने झाले तरीही बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सरकाळे बोलण्यास नकार देत आहेत , यामुळे सरकाळे नक्की का ? कारवाई घेत नाहीत ? नेमका दबाव कोणाचा आहे ?

नक्की कोण आहे हा सचिव नक्की काय प्रकरण आहे

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नियंत्रणातील सचिवांचा केडरचा बजरंग हा मूळचा कठापूरचा रहिवाशी असलेला सचिव केंजळे याने विकास सेवा सोसायटी कठापूर येथील सचिवांशी हाथमिळवणी करत, कठापूर सोसायटीमध्ये व स्टेट बँक कोरेगाव मध्ये आपल्या ज्ञानाचा, पदाचा व बोगस दाखल्यांच्या आधारे एकाच क्षेत्रावर, व पिकावर सवलतीच्या दरातील पीककर्ज काढले, हे कोरेगाव तालुका सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या चौकशीतून सिद्ध झाले.

हाच बजरंग केंजळे कण्हेरखेड मध्ये गेली वीस वर्षे सचिव म्हणून काय कारभार करतोय. ह्याच्या एकदंरीत कारभाराच्या खुलाशात कण्हेरखेड विकास सेवा सोसायटीला भेट दिल्यावर, कण्हेरखेड विकास सेवा सोसायटी ही सचिव व संस्था पातळीवरील भ्रष्टाचाराचे आदर्श मॉडेल म्हणून पाहता येईल. राष्ट्रमतच्या कण्हेरखेड विकास सेवा सोसायटी भेटीत अनेक भयंकर प्रकार समोर आले.

कण्हेरखेडच्या गावचे सरपंच, माजी सरपंच यांनी हा दुबार पीककर्जाचा प्रकार गावपातळीवर बजरंग केंजळेच्या मदतीने बरेच वर्ष करत शेकडो शेतकऱ्यांना ह्यात ओढलंअसल्याचे कबूल केले. ही संस्था तालुका किंवा जिल्हा पातळीवर नेतृव ज्यांचं नेतृत्व मानते ते म्हणजे जिल्हा बँकेचे संचालक, श्री नितिन पाटील यांनी त्यांना ह्याबद्दल काहीच माहिती नसल्याचे सांगत, ती विकास सेवा सोसायटी व ग्रामपंचायत ही त्यांना नेतृत्व मानते असं कबूल केलं.

कण्हेरखेडचे भ्रष्ट कारभारी तर सोडा, पण डिस्ट्रिक्टसुपरव्हिजनच्या केडरच्या कार्यकारी प्रमुख श्री सरकाळे यांनी सुद्धा, ह्या कारभाराबद्दल नितिन पाटील व संचालक मंडळाला अंधारात ठेवलं आहे. बँकेच्या CEO सरकाळे हे पुरस्कार मिळाले हे लोकांना सांगत असले तरी त्यांना डिस्ट्रिक्ट केडर प्रमुख म्हणून कोरेगाव AR, DDR, सहकार आयुक्त, सहकार मंत्री याचबरोबर नाबार्ड कडूनही खुलासा वजा नोटीस पाठवण्यात आल्याचे संचालकांना माहित नाही ह्यावर विश्वास ठेवणं कठीण जातंय. ज्या नाबार्ड चे पुरस्काराने बॅकेला गौरवण्यात आले त्या नाबार्ड ने नोटीस काढल्याने सहकार क्षेत्रात ऐन निवडणुकीच्या काळात वातावरण ताईट झाल.

श्री नितिन पाटील आणी इतर संचालक मंडळ बजरंग केंजळेबाबत आता काय माहिती व जबाबदारी घेत कार्यवाही घेणार याची आता सर्वाना उत्सुकता आहे.

खास नितिन पाटील यांच्या माहितीसाठी कण्हेरखेड विकास सेवा सोसायटीच्या कारभाराबद्दल आमच्या बातमीची लिंक :

सातारा जिल्हा बँकेत हजारो कोटींचा घोटाळा?

‘कण्हेरखेड विकास सेवा सोसायटी’ ; भ्रष्टाचाराचे माहेरघर?

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: