सातारा 

75 लाखांचा चुना लावून ‘बंटी आणि बबली’ फरार…

सातारा (महेश पवार) :

भुईंज ता. वाई येथील अमर कडव यांनी राहुल बजरंग मोरे यांचे सांगण्यावरुन पल्लवी आत्माराम घाडगे व अक्षय अनंत सावंत यांच्या गोल्ड स्किममध्ये पैसे गुंतवून घेतलं व तसं लेखी ही दिलं व संपूर्ण रक्कम बॅक खात्यात जमा करून घेतली व काही दिवसांतच फरार झाले. कडव यांच्यासह भुईंज येथील अन्य लोकांनी जवळपास ७५,८९,०००/- गुंतवणूक केली होती. संबंधित आरोपी विरोधात भुईंज पोलीसांनी ४२०च्या कलमानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अमर कडव यांनी भुईंज पोलिस स्टेशनला एक वर्षापुर्वी गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दिली. पण ती दखल घेतली गेली नाही. यामुळे कडव यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले, यानंतर भुईंज पोलीसांनी संबंधितांवर गुन्हा नोंद केला.

या प्रकरणात सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा समावेश असल्याने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप कडव यांनी केला. संबंधित आरोपीना वाचवण्यासाठीच वर्षभर गुन्हा दाखल केला नाही. यामुळे भुईंज पोलिस आता पडद्याआड असलेल्या आरोपींना ताब्यात घेणार का? की फक्त नावालाच कारवाई दाखवणार? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.

या ‘बंटी आणि बबली’ने गोवा, कणकवली, सिंधुदुर्ग, सातारा येथील अनेक लोकांना कोट्यवधी रुपयांना चुना लावून फरार झाले असल्याचे कळते आहे.

दरम्यान, राहुल बजरंग मोरे याला भुईंज पोलीसांनी अटक केली असून पोलिस आता पल्लवी घाडगे व अक्षय सावंत यांच्या शोधात आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: