सातारा 

सातारा पालिकेची आगामी निवडणूक तिरंगी..?

सातारा (महेश पवार) :

गेल्या काही दिवसांपासून सातारा नगरपालिकेत एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप सुरू असल्याने उदयनराजे भोसलेंची सातारा विकास आघाडी आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची नगरविकास आघाडी एकत्र येणं शक्य नाही. आजही जरी दोन्ही सातारा राजे एकाच पक्षाचे असले तरी ते वेगळ्या मार्गाने असल्याचे दिसून येते.

मागिल काही महिन्यांपूर्वी शशिकांत शिंदेनी सातारा पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी उतरणार असल्याचे संकेत दिले होते यामुळे राष्ट्रवादी सातारा पालिकेच्या निवडणुकीत आपलं पाऊल टाकणार हे स्पष्ट झाले.

आरोप प्रत्यारोप सुरू असल्याने दोन्ही राजे एकत्र नसल्याने, भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे आहेत .
तर उदयनराजे भोसले यांच्या ताफ्यात कॉंग्रेसचे कार्यकर्ते तर राष्ट्रवादी सोबत शिवसेना अशी तिरंगी निवडणुक होणार असल्याची राजकीय गोटात चर्चा सुरू झाली आहे. यामुळे होणा-या सातारा पालिकेच्या निवडणुकीत उदयनराजे भोसले , शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विरोधात तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व कोण करणार याची उत्सुकता सातारावासियांना लागली आहे.

तर तिकीट मिळावे म्हणून कार्यकर्ते कामाला लागले, या ना त्या मार्गाने चर्चेत राहण्यासाठी काहींना काही करताना दिसत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: