सातारा 

‘फाईव्ह स्टार’ कार्यशाळेवर जिल्हा बँकेची लाखोंची उधळपट्टी?

सातारा (महेश पवार) :

शेतकऱ्यांची बँक म्हणून नावलैकिक असलेल्या जिल्हा बँकेच्या संचालकांनी एका कथित कार्यशाळेसाठी सुमारे चार लाख खर्च केल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे.

सातारा जिल्ह्याची आर्थिक, राजकीय, वित्तीय वाहिनी असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेची काही दिवसांपूर्वीच निवडणूक झाली. यानंतर संचालक सदस्य यांची एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली , पण ती महाबळेश्वर कार्यशाळा एका महागड्या फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये घेण्यात आली आणि त्यावर तब्बल तीन लाख नव्वद हजार रुपये खर्च करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी ‘राष्ट्रमत’ला दिली आहे.

कोविडमुळे शाळकरी विद्यार्थ्यांपासून ते उच्चशिक्षण घेणार्यांना ऑनलाईनचं महत्व सरकार सांगत आहे. मात्र सरकारी प्रकल्प असलेल्या सातारा जिल्हा बँकेच्या संचालकानी मात्र महाबळेश्वरच्या पंचतारांकित हॉटेलात कार्यशाळेवर लाखोंची उधळपट्टी करत सरकारला घरचा आहेर दिला आहे.

वास्तविक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे दालनच एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेल सारखं असताना देखील महाबळेश्वरातच का कार्यशाळा घेण्यात आली? असा प्रश्न सर्वसामान्य सभासद विचारात आहेत. कारण शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना राबवताना कॉस्ट व्हर्सेस प्रॉफिटॅबिलिटी, फेंसिबिलीटी असे शब्द ऐकवले जातात. पण संचालकांचे कोणतेच दौरे साध्या, किंवा काटकसरीत पार पडत नाहीत, अशी तक्रार सभासद करत आहेत.

ऐन कोरोना काळात शेतकऱ्यांना विमा संरक्षण योजना राबवण्यासाठी पैसे नाहीत, असे बँकेकडून सांगण्यात आले होते. पण आता संचालकांच्या कार्यशाळेसाठी पैसा कुठून आला? यशवंतराव चव्हाण, किसनवीर यांच्या विचारांचा वारसा अशा प्रकारे चालवला जाणार आहे का? अशीही विचारणा सभासदांकडून होत आहे.

दरम्यान, बँकेकडून या सगळ्या प्रकारावर समाधानकारक उत्तर मिळावे अशी अपेक्षा सभासदांनी केली आहे.

उद्या वाचा :
‘फाईव्ह स्टार हॉटेलात बॅंकेच्या पैशातून कोणाला करायचं होतं स्पा ?’

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: