सातारा 

सातारा बँकेसाठी अद्याप ९० टक्के मतदान

कराड (अभयकुमार देशमुख) :

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू असून तीन वाजेपर्यंत 90 टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. कराड सोसायटी मतदारसंघात १००% मतदान झाले असून सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आणि ॲड. उदयसिंह पाटील यानी दुपारनंतर मतदानाचा हक्क बजावला.


कराड सोसायटी मतदारसंघातील उमेदवार आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सहकार पॅनेलच्या १० जागा विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी बोलताना पाटील यांनी पाच वाजेपर्यंत शंभर टक्के मतदान होईल अशी अपेक्षा असून जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रबोधन झाले आहे . त्यामुळे मतदान शंभर टक्के होईल अशी खात्री असल्याचे सांगितले. जावळी मतदारसंघात झालेल्या वादाबाबत बोलताना मंत्री पाटील म्हणाले, जावळी मध्ये सकाळी किरकोळ वाद झाला. मात्र तो वाद मिटला असून ज्यांनी वाद केला ते दोघे दुपारनंतर एकत्र वावरत होते. सहकार पॅनेलचे 21 पैकी 11 जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित दहा जागांसाठी आज मतदान होत आहे. त्यांनी दहा जागाही चांगल्या मताने निवडून येतील असं सांगितले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: