सातारा 

‘साताऱ्याचे DDR कारवाईला विलंब का करत आहेत?’

तक्रारदार किशोर शिंदे यांचा थेट सवाल 

सातारा (महेश पवार) :
जिल्हा बँकेचे केडर सचिव बजरंग केंजळे व कठापूरचे सचिव क्षीरसागर यांनी संगनमताने बोगस दाखले देऊन केलेल्या पिक कर्ज घोटाळ्यातील सचिव यांच्यावर कार्यवाही घ्यावी यासाठी सहकार आयुक्त कार्यालयामार्फत सहावेळा, सहकार मंत्री यांनी चारवेळा , नाबार्ड पुणे चिएफ जनरल मॅनेजर यांचे पत्रं, कोल्हापूर चे जॉईंट रेजिस्ट्रार यांचे कार्यवाही घेण्याचे पत्रं असताना देखील , कोरेगाव तालुका सहाय्यक निबंधक यांचा मागील 10 महिने पाठपुरावा सुरू असताना तसेच , कोरेगाव तहसीलदार कार्यालयाचे कार्यवाही घेण्याचे पत्रं असताना देखील, सर्व पुराव्यानिशी निर्देशाना दुर्लक्षित करत संबंधितांवर कारवाई करण्यास  साताऱ्याचे DDR  यांनी विलंब का लावत आहेत? असा थेट सवाल विचारत तक्रारदार किशोर शिंदे यांनी या विषयाची केंद्रीय तपासणी यंत्रणेकडून चौकशी व्हावी अशी मागणी पत्रकाद्वारे केली आहे .
साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण यांच्या कष्टाने वाढवलेल्या सहकारात राजकीय पक्षांचे अतिमहत्वकांक्षा असलेले घटक शिरले असून, ते साताऱ्याच्या DDR यांना सुद्धा वेठीस धरण्याचे काम करताहेत हे चित्रं आता दिसू लागलंय. विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटीच्या भ्रष्ट सचिवावर कार्यवाही घेण्याची धमक जर DDR दाखवत नसतील, तर जरंडेश्वर” सारखें जिल्ह्यातील इतर कारखान्यांची परिस्थिती होणार नाही कशावरून? असा सवाल किशोर शिंदे यांनी पत्रकात विचारला आहे.
DDR
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: