सातारा 

सातारा जिल्हा बँकेत हजारो कोटींचा घोटाळा?

जिल्हा बँकेच्या कामकाजाबाबत निर्माण झाले प्रश्नचिन्ह

सातारा (महेश पवार) :

सातारा जिल्हा बँकेच्या केडरच्या नियंत्रणात असलेल्या विकास सेवा सोसायटीच्या सचिवांनी राष्ट्रीयकृत बँकांना पीककर्ज असताना, नसल्याचे खोटे दाखले देत हजारो कोटींचा महापीककर्ज घोटाळा केल्याचा आरोप येथील कण्हेरखेड गावचे सामाजिक कार्यकर्ते किशोर शिंदे यांनी केला असून, यासंदर्भात त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारदेखील दाखल केली आहे.

कोरेगाव तालुका AR संजय सुद्रिक, व सातारा जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर ह्यांना सहकार आयुक्त, कार्यालय, कोल्हापूर जॉईट रेजिस्ट्रार, तहसीलदार कोरेगाव, स्टेट बॅंक ऑफ इंडिया यांनी पुराव्यासह दिलेल्या कार्यवाही घेण्याच्या सूचनांना अजूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत दोषींना पाठीमागे घालत असल्याचेही किशोर शिंदे यांचे म्हणणे आहे.

 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ईडीच्या  फेऱ्यात अडकल्यानंतर आता सामाजिक कार्यकर्ते किशोर शिंदे यांनी बँकेच्या गैरव्यवहारावर बोट ठेवणारे पत्र दिल्यामुळे जिल्हा बँकेच्या एकूण कामकाजाबद्दलच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, बँक आता या सगळ्यावर काय पाऊले उचलते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या सातारा जिल्हा बॅंक अधिकारी व बँकेच्या नियंत्रणात असलेल्या 200 हुन अधिक विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटीच्या सचिवांनी कोट्यवधी रुपयांचा पीककर्ज घोटाळा केलेला आहें. या घोटाळ्याचे सर्व  पुराव्यासह कागदपत्रे, तक्रारी जिल्हा बँकेच्या अधिकारी वर्गाला वारंवार देऊन सुद्धा त्यांच्या तालिबानी पद्धतीने चालवलेल्या कारभाराला जिल्हा सहकार प्रशासन सुद्धा हतबलतेने हाताळत आहें.

जिल्हा बँकेच्या केडरच्या नियंत्रणात असलेल्या, सचिवांनी शेतकऱ्यांचे शोषण वर्षानुवर्षे चालू ठेवलंच आहें, पण ह्यांनी पदाचा, माहितीचा वापर करत, राजकीय, व अधिकारी वर्गाच्या आशीर्वादाने राष्ट्रीयकृत बँका यांची दिशाभूल करत शासनाच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या सवलतीच्या पीककर्ज योजनेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला आहें.  ह्यांनी एकाच 7/12 वर सवलतीच्या दरात एकापेक्षा जास्त संस्था, बँका यांच्याकडून पीककर्ज घेत, राष्ट्रीयकृत बँकांची फसवणूक करत दुबार पीककर्ज घोटाळा केला आहें. एक पीककर्ज विकाससेवा सोसायटीमधून चालू असताना ते नसल्याचे खोटे निरंक दाखले देत गेली अनेक वर्षे राष्ट्रीयकृत बँकांकडून पण पीककर्ज घेतले आहें. स्वतः जिल्हा बँकेच्या केडरच्या नियंत्रणात असलेल्या सचिवांनी स्वतःच्या शेतीवर पण बँकांची फसवणूक करत हे प्रकार गेली कित्येक वर्षे चालूच ठेवले आहेत. जिल्हा बँकेच्या केडर नियंत्रित सचिव बजरंग केंजळे यांनी तर अनेक विक्रम करत कोरेगाव तालुक्यातील मौजे  कण्हेरखेड व मौजे कठापूर या गावांतील शेकडो शेतकऱ्यांना ह्या जाळ्यात अडकवत बेधुंद कारभार केला आहें. जिल्हा बॅंक अधिकारी अशा प्रवृत्तीला खतपाणी घालायचं काम करताहेत, व त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही न करता त्यांना अभय देण्याचाच प्रकार चालू ठेवला असल्याचे किशोर शिंदे यांनी सांगितले आहे.
satara bank

सचिव बजरंग रामसिंग केंजळे यांनी केलेल्या फौजदारी गुन्ह्याबद्दल त्यांचं निलंबन घेत, इतर सर्व केडर सचिवांचा तपशील आम्हाला द्यावा अशी त्यांनी मागणी केली आहे. शेतकऱ्यांना शासन धोरणाप्रमाणे सर्व शेतकऱ्यांना जमीनधारणेनुसार, पीकनिहाय खर्चासाठी सवलतीच्या दरात पीककर्ज मिळवून देत, शेतकऱ्यांचा विकास ह्या उद्देशाला सातारा जिल्हा बँकेच्या नियंत्रणातील भ्रष्ट सचिव, मूळ गाव कठापूर, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा बजरंग रामसिंग केंजळे व इतर शेकडो सचिवांनी हरताळ फासल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

मूळचा कंठापूरचा रहिवाशी असलेला व कण्हेरखेड गावच्या विकास सेवा सोसायटीमध्ये 20 वर्षे एकाच ठिकाणी बदली न होता सचिव म्हणून सेवेत असलेल्या बजरंग केंजळे याने स्वतःच्या पदाचा व माहितीचा गैरवापर करत कठापूरच्या स्वतःच्या जमिनीवर स्टेट बॅंक ऑफ इंडिया व कठापूर विकास सेवा सोसायटीच्या सचिवांशी हातमिळवणी करत, बोगस निरंक कर्जदाखले देत घेत, एकाच 7/12 वर एका वेळी 2 सवलतीच्या दराच्या कर्जांचा लाभ घेत शासनाची, बँकांची, व करदात्यांची फसवणूक केली आहें. हाच प्रकार कण्हेरखेड व कठापूरच्या भ्रष्ट संचालक मंडळींना व गावगुंडांना हाताशी धरत  टक्केवारी घेत शेकडो शेतकऱ्यांना ह्या जाळ्यात अडकवलं आहें. प्रत्येक गावांतील अशा शेकडो शेतकऱ्यांना अडकवण्याचा व मनमानी कारभाराचा सपाटा जिल्हा बँकेच्या नियंत्रणात असलेल्या शेकडो मगरूर, बेशिस्त सचिवांनी लावलेला पाहुन, मुख्यमंत्री, सहकार प्रशासनाला तक्रार देण्यात आली.

सदर प्रकरणात, सहकार प्रशासनाने लक्ष घालताच सातारा जिल्हा बँकेचे CEO राजेंद्र सरकाळे यांनी तक्रारदार यांना भेटायला बोलावत हा प्रकार दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही शिंदे यांनी केला पण त्यानंतर तक्रारदार आपल्याला जुमानत नाही हे पाहिल्यावर पुन्हा अशी दुबारपीककर्ज होऊ नयेत यासाठी सरकाळे यांनी परिपत्रक काढले असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

जिल्हा बँकेच्या नियंत्रणात असलेल्या बजरंग केंजळे सारख्या मगरूर कर्मचाऱ्यांना कसलीच भीती नाही. ह्यांच्यावर गुन्हे दाखल होतं, फसवणूकींच्या अपराधाबद्दल निलंबन होत सर्व सचिवांची वैयक्तिक व त्यांनी वाटप केलेल्या सर्व दुबार कर्जांची चौकशी व्हावी अशी मागणी किशोर शिंदे यांनी केली आहे.
वाढत्या बँकिंग क्षेत्रातील स्पर्धेत सेवा देऊन टिकण्याची क्षमता नसलेल्या, व राजकीय पक्षांच्या पिल्लावळांनी राजकारणाचा उकिरडा केलेल्या विविध कार्यकारी विकास सेवा सोसायट्या व तेथील सचिवांचा हा भ्रष्टाचार आहें. ह्यात बँकेचे अधिकारी आणी स्वयं घोषित राजकारण्यांचा त्यांना विषेश हातभार आहेच.
– किशोर शिंदे, सामाजिक कार्यकर्ते  
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: