सातारा 

घरगुती भांडणातून पेटवले घर; दहा घरे आगीच्या भक्ष्यस्थानी

कराड (अभयकुमार देशमुख) :

माजगाव (ता. पाटण) येथे पती-पत्नीच्या घरगुती भांडणातून पतीने स्वतःचे घर पेटविल्याने शेजारील नऊ घरांना भीषण आग लागली. ही घटना सायंकाळी घडली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने दहा घरातील संसारोपयोगी साहित्य, धान्य, दागिने, रोख रक्कम, शेतीची औजारे जळून खाक झाली.


सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. या अगीत अंदाजे 50 लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक माहितीत समजत आहे. या प्रकरणी संजय पाटील यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, माजगाव येथील संजय रामचंद्र पाटील व त्याची पत्नी पालवी यांचे घरगुती भांडण दिवसभर सुरू होते. या भांडणातून संजय पाटील याने स्वत:च्या राहत्या घराला आग लागली लावली. त्यामध्ये घरातील दोन गॅस सिलेंडरने पेट घेतल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे शेजारील पांडुरंग पाटील, ज्ञानदेव पाटील, संभाजी पाटील, चंद्रकांत पाटील, भीमराव पाटील, दत्तात्रय पाटील, कृष्णात पाटील, पंढरीनाथ पाटील, गोरखनाथ पाटील व आनंदराव पाटील यांच्या 10 घरांना भीषण आग लागली.घटनेची माहिती मिळताच पाटण तालुका खरेदी विक्री संघ, सह्याद्री सहकारी साखर कारखाना व जयवंत शुगर यांच्या अग्निशामक पथकाला पाचारण केले होते. आगीची माहिती मिळताच सरपंच प्रमोद पाटील, मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर, पोलीस शास्त्राचे सिद्धांत शेडगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली. याप्रकरणी संजय पाटील यास मल्हारपेठ पोलिसांनी अटक केली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: