सातारा 

काळोशीत ‘हायव्होलटेज’ धमाका! पस्तीस टीव्ही जळाले…

सातारा (महेश पवार) :

तालुक्यातील परळी भागातील काळोशी येथे शनिवारी सायंकाळी अचानक  हायव्होलटेज झाल्याने जवळपास पस्तीस टिव्ही जळाले. तर काही जणांची मिटर जळाले. महावितरणच्या या अनागोंदी कारभारामुळे सामान्य नागरिकांना मोठा फटका बसला असून , संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी काळोशी येथे जाऊन पाहणी केली व झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. गेली दोन महिने झाले स्थानिक महावितरणकडे तक्रार करत आहेत की व्होलटेज कमी जास्त होत आहे तरीदेखील संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याने ही घटना घडली असून, कोरोनासारख्या महामारीत लोकांना मोठा फटका बसला आहे. महावितरणची चुक असल्याने येथील रहिवाश्यांना नुकसान भरपाई दिली नाही तर महावितरणच्या मुख्य कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा मोहिते यांनी दिला.

गोरखनाथ निवृत्ती निकम यांच्या घरात टिव्हीला आग लागली, यावेळी त्यांच्या समवेत त्यांची पत्नी होती. अचानक आग लागल्याने त्यांना काय करावे सुचलेच नाही , त्यांनी शेजारी असलेल्या युवकाला बोलवलं यानंतर त्याने जळता टिव्ही उचलून बाहेर काढत पाणी टाकून विजवला. संबंधित युवक वेळेवर आला नसता तर या ठिकाणी विपरीत घटना घडली असती.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: