सातारा 

‘नगराध्यक्षांनी कराडकरांची आणि सभागृहाची माफी मागावी’

कराड (अभयकुमार देशमुख) :

कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्यावर लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. ते लोकशाही आघाडीने घेतेलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.


कराड नगरपरिषदेची विशेष सभा नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्या अधक्षतेखाली बोलवली होती. या सभेमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कराड शहरामध्ये उपाय योजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली होती. या चर्चेत आर्थिक तरतुदीचाही विचार विनिमय झालेला. सर्वानुमते होणाऱ्या खर्चात पालिकेतील पदाधिकारी, सदस्यानी वाटा उचलावा असे ठरले. त्यानुसार पदाधिकारी, सदस्यांचे मानधन आणि मिटींग भत्ते एप्रिल २०२० ते पंचवार्षिक संपेपर्यंत नगरपरिषदेच्या जनरल फंडामध्ये वर्ग करण्याचा विषय एकमताने मंजूर झालेला. मानधन, भत्ते नगरपरिषदेच्या जनरल फंडामध्ये जमा करण्याची उपसुचना एकमताने मंजूर झालेली असताना शिंदे यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी उपसुचनेतील इतर सर्व मुद्दे ठरावात घेवून मानधन हा शब्द हेतुपूर्वक वगळून ठराव बनवला आणि आपल्या अधिकाराचा वापर करुन प्रोसिंडीग बनवले असून नगराध्यक्षांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप सौरभ पाटील यांनी रोहिणी शिंदे यांच्यावर केला आहे.


तसेच नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी कराडकरांची आणि सभागृहाची माफी मागावी अशी मागणी सौरभ पाटील यांनी केली आहे. या पत्रकारपरिषदेला सुभाष पाटील, नगरसेविका पल्लवी पवार, नगरसेवक वैभव हिंगमिरे, नगरसेवक मोहसीन आंबेकरी, शिवाजी पवार, आख्तर आंबेकरी, जयंत बेडेकर आदी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: