सातारा 

​सातारचा ‘बाजार उठला’ !

पावसाने केली मंडईची दयनीय अवस्था

​सातारा (महेश पवार) :​

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील बाजार सध्या जिल्हापरिषद ग्राऊंडवर भरत आहे​. ​पण तोकते वादळाने ह्या सातारचा बाजार उठवला आहे ? बाजार हा ग्राऊंडवर भरत असल्याने पाऊसामुळे शेतकरी व्यापारी यांची इतकी वाईट अवस्था झाली की पा​वसात मंडई विकायची का पा​वसापासून मंडई  वाचवायची अशी अवस्था झाली . यामुळे सध्यातरी चित्र असं आहे की सातारचा बाजार उठल्याची स्थिती निर्माण झाली.

सातारा नगरपालिकेने शेतकरी व व्यापारी यांच्यासाठी याठिकाणी कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध न केल्याने मोठं नूकसान झाले . याठिकाणी घसरगुंडी झाली असून खरेदी साठी येणाऱ्या ना ही मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे सातारा नगरपालिका प्रशासनाने तातडीने लक्ष घालुन काहीतरी उपाययोजना करावी अशी मागणी शेतकरी बांधव व व्यापारी करत आहेत.

satara market​​

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: