सातारा 

पालकमंत्री आणि भाजपच्या आमदारात रंगले वाकयुध्द…

सातारा (अभयकुमार देशमुख) :
जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि माण – खटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्यात कोरोनावरुन आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत.
जयकुमार गोरे यांनी कोरोना काळात जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीवरुन टिका केली आहे. थोड्या दिवसापूर्वी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा जिल्ह्यातील कोरोना संदर्भातील नियमात बदल केले. आणि जिल्ह्यवासियांना काही प्रमाणात सुट दिलीय. हाच धागा पकडत जयकुमार गोरे यांनी शेखर सिंह आणि पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यावर आरोप केलेत.

 

या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहे. हा संशोधनाचा विषय आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी शेखर सिंहच असल्यासारखे वाटत असल्याची टिका आमदार गोरे यांनी केली आहे.

जयकुमार गोरे यांनी केलेल्या आरोपाबाबत पत्रकारांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना विचारले असता. मी कोणाच्या आरोपांना उत्तर देत नाही. राजकीयही बोलत नाही. त्यामुळे माझ्यावर कोणी काय आरोप केलेत. ते मला माहित नाही. मी २१ वर्ष या जिल्ह्याचा आमदार असल्याचे उत्तर बाळासाहेब पाटील यांनी दिले.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: