सातारा 

आंबेघर भोगवली सोसायटीमध्ये भ्रष्टाचार 

​​सातारा ​(महेश पवार) :
जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील आंबेघर भोगवली येथील महेंद्र नारायण गोळे​, भिकाबाई नारायण गोळे यांच्या नावाने सोसायटी मध्ये कर्ज घेत​ले नसताना देखील १९/२० व २०/२१ मध्ये कर्ज घेतल्याचं समजताच त्यांनी बॅंकेत ही विचारपूस केली परंतु त्यांनी कर्ज  नसल्याचे सांगितले परंतु ज्यावेळी  त्यांनी कर्जदारांची यादी मागविली त्यात त्यांचे नाव असल्याचं समजताच त्यांना धक्का बसला.

​दरम्यान, ​गोळे यांनी ​’​राष्ट्रमत’शी बोलताना सांगितले की या सर्व प्रकरणात सचिव आणि संचालक मंडळ यांनी माझ्या आणी माझ्या आईच्या कोणत्याही सह्या नसताना देखील कर्ज कशी काढली गेली यात कोण कोण सहभागी आहे हे समोर आले पाहिजे व संबंधित अधिकारी व संचालक यांच्यावर कारवाई ​करण्याची मागणी केली. ​
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: