सातारा 

‘मोबाईलचा वाढता वापर विद्यार्थांसाठी घातक’

भुईंज (मयुरी पिसाळ):

अभ्यास आणि ज्ञानप्राप्ती व्यतिरिक्त मोबाईलचा वाढता वापर घातक असून विदयार्थ्यांना मोबाईलकडून मैदानाकडे वळवणे आवश्यक आहे. त्यासाठी तिरंगाचे प्रयत्न आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील यश कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन भुईंजचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे यांनी पाचवड, ता. वाई येथे केले.तिरंगा इंग्लिश स्कुलतर्फे मडगाव (गोवा) येथे झालेल्या नॅशनल युथ स्पोर्ट फेडरशनच्या चौथ्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त करून नॅशनल चॅम्पियनशीप प्राप्त केल्याबद्दल तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेबद्दल सुशांत बाजीराव धुरगुडे आणि अमित विलास साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी सपोनि कांबळे बोलत होते. यावेळी रेनशॉ कंपनीचे व्यवस्थापक निलेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना सपोनि कांबळे म्हणाले, उपविभागीय पोलीस विभागामार्फत निर्भया पथक, पोलीस काका , पोलीस दीदी संकल्पना असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तिरंगा सारख्या उपक्रमशील संस्थेला अशा उपक्रमात सहभागी करून घेऊ.


निलेश जाधव म्हणाले, ग्रामीण विद्यर्थांकडे क्षमता व धमक आहे. त्याला इच्छाशक्तीची व मार्गदर्शनाची जोड मिळाल्यास कसे विद्यार्थी घडतात हे तिरंगाने दाखवून दिले. विद्यार्थांनी मोठी स्वप्न पहावी, जागतिक भान ठेवावे, स्वतःच्या करिअरला प्राधान्य द्यावे.
संस्थेचे सचिव पै. जयवंत पवार यांनी स्वागत केले, प्राचार्या वनिता पवार यांनी प्रास्ताविक केले, संस्थेची माहिती मुख्याध्यापिका वैशाली कुंभार यांनी दिली. राहुल तांबोळी यांनी आभार मानले.
यावेळी वाई तालुका पत्रकार संघाचे माजी उपाध्यक्ष विलास साळुंखे, जयवंत पिसाळ, प्रा. सतीश जंगम, प्रा. मिलिंद स्वामी, पांडुरंग खरे, संजय माटे, सचिन इथापे आदी उपस्थित होते

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: