महाराष्ट्रसातारा 

‘… म्हणून केल्या पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी’

कराड (अभयकुमार देशमुख) :

केंद्र सरकारने पेट्रोल वरचे आणि डिझेलचे कर कमी केल्यानंतर पेट्रोल पाच रुपये तर डिझेल दहा रुपयांनी कमी झाले आहे. यावरती अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारने केलेल्या कर कपातीमुळे कपातीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी झाल्यात हे खरं असलं तरी सध्या देशात झालेल्या पोटनिवडणुकीत पोटनिवडणूक लागलेले निकाल हे केंद्र सरकार विरोधी असल्याचे भाजपच्या लक्षात आल्यानेच सरकारने कर कपातीचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

नागरिकांचा वाढत्या महागाईमुळे प्रचड्ड रोष आहे. आणि तो रोष केंद्र सरकारच्या लक्षात आल्याने त्यांनी ही कर कपात केलेली आहे असं म्हटलं आहे. मनमोहनसिंग सरकारच्या काळामध्ये पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाडीवोरोधात रस्त्यावर उतरणारे आज गायब असून ते भाजचेच लोक होते. त्यांना भाजपनेच प्रसिद्धी दिली भाजपचे हि संबंध हे पाहतात भाजपच्या विरोधकांवर टीका करण्यास लगेच पुढे येतात आता मात्र ते गायब आहेत, असा टोला लगावला.

तर मोदी सरकारची एक स्टॅटजी ठरली असून विरोधकावर दहशत करण्याकरता त्यांच्यावर छापा टाका, धाडी टाका त्यांच्या विरोधात बातम्या लावा काही जणाना नार्कोटेक्सच्या बाबतीत अडकवले आहे. काहीना इडीच्या नोटीसा दिल्या आहेत.पण याममध्ये एकाचाही अंतिम निर्णय लागला नाही. याचे उत्तर सरकारला द्यावे लागेल असंही मत व्यक्त केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: