google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

साताऱ्यात सहाय्यक फौजदाराचा झाला हवालदार

सातारा (प्रतिनिधी) :

गुरुकुल स्कुल प्रिन्सिपॉल, पदाधिकारी यांना बेकायदा ताब्यात ठेवून स्कुलवर दरोडा टाकायला मदत केल्याचे प्रकरण चेअरमन राजेंद्र चोरगे यांनी दाखल केले होते. यात सहाय्यक फौजदार विजय शिर्के याला जबाबदार धरून त्याला हवालदार केल्याची शिक्षा अधीक्षक बन्सल यांनी केली. दरम्यान, केवळ खात्यांतर्गत शिक्षा न देता तत्कालीन एलसीबी प्रमुख पद्माकर घनवट सह शिर्केवर नोकरीतून बडतर्फ करून कायदेशीर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राजेंद्र चोरगे यांनी केली आहे.

दरम्यान, सामान्य नागरिकांप्रमाणेच यांच्यावर गुन्हे दाखल करून पोलीस दलातील असली वाळवी ठेचून काढली पाहिजे, अशी चर्चा आहे.

गुरुकुल संबंधित सर्वांना एकाच वेळी ताब्यात घेऊन दरोडा टाकण्याच्या प्रकरणात राजेंद्र चोरगे यांनी पद्माकर घनवट आणि विजय शिर्के विरोधात ब्लॅक मेलिंग, भीती घालून लाखों रुपये उकळणे आणि दरोड्याला साहाय्य करणे असे आरोप पुराव्यानिशी केले होते. पोलीस अधीक्षक आणि संबंधित प्राधिकरणाकडे हे लेखी आरोप होते.

या आरोपावरून 2018 पासून घनवट आणि शिर्केच्या विविध स्तरावर एकूण पाच शासकीय चौकश्या झाल्या. दरम्यान, घनवट यांची पुण्याला बदली झाल्याने पुणे ग्रामीण अधीक्षकांनी त्यांच्यावर कारवाई करावी, असे साताऱ्यातून कळवण्यात आले होते.

चार वर्षांत झाल्या पाच चौकश्या :
साताऱ्यात पोलीस उपअधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, वाई उपअधीक्षक टिके यांनी विविध चौकशी केल्या होत्या. याच प्रकरणात कराड उपअधीक्षक रणजित पाटील यांनी केलेली चौकशी चुकीची असल्याने त्यांच्यावर ताशेरे ओढून ती रद्द केली होती.नंतर 5 वी विभागीय चौकशी अप्पर पोलीस अधिक्षक अजीत बोराटे केली.

अखेर या चौकशींच्या फेऱ्यांत राजेंद्र चोरगे यांनी केलेल्या आरोपांतले तथ्य समोर आले आणि सिद्ध झाले त्यामुळेच अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सहाय्यक फौजदार विजय शिर्केला पदावरून हाकलून देत हवालदार केले.

गुन्हा तोच तर पोलिसांना आणि सामान्यांना न्याय वेगळा का? :
कित्येक पदाधिकाऱ्यांना बेकायदा ताब्यात ठेवून दरोड्याला मदत करण्यासारख्या एकदम गंभीर प्रकरणात सामान्य माणसाला तुरुंगात जावे लागले असते पण पोलीस खात्याची वर्दी आड करून शिर्केला केवळ पदावरून हटवणे आणि घनवटला अद्याप मोकळे सोडणे हा न्याय नाही. उलट हे पोलीस खात्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रकार आहे.

आरोपांत तथ्य सापडले आहे, तर यांच्यावर सामन्य जनातेप्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे ही राजेंद्र चोरगे यांची प्रमुख मागणी आहे. आणि कायद्यामध्ये तशी थेट तरतूद आहे.

गुन्हा दाखल झाला तर अनेक प्रकरणे येतील उजेडात :
गुन्हा दाखल झाल्यावरच गुरुकुलचे पदाधिकारी, प्रिन्सिपॉल, कर्मचारी यांना ताब्यात घेऊन दरोड्याची सुपारी घेतल्याचे पुराव्यानिशी स्पष्ट व सिद्ध होणार आहे.

आपल्या प्रमुख मागणीकडे दुर्लक्ष झाले तर या प्रकरणात आपण न्यायालयात जाणार असल्याचे राजेंद्र चोरगे यांनी सांगितले आहे.
दरम्यान, पोलीस खात्याचा वापर करून दरोड्यासारखे गुन्हे सरेआम साताऱ्यात घडत होते हे सातारकरांसाठी धक्कादायक आहे. त्यामुळे यांच काळातील अनेक प्रकरणे चौकशीच्या रडारवर येणार आहेत. अश्या प्रकरणांमुळे पोलीस खाते बदनाम होत असल्याने राज्य शासनाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे जाहीरपणे बोलले जात आहे.

गुरुकुल प्रकरणात समोर पुरावे असूनही कोणतीच कारवाई न केल्यामुळे तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते याही वादाच्या भोवऱ्यात आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!