google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

40 कामगारांसह गाडी 400 फूट दरीत कोसळली…

सातारा (महेश पवार) :

महाबळेश्वर वरुन तापोळ्या कडे निघालेल्या कामगारांच्या गाडीला शनिवारी सकाळी अपघात झाला , ही घटना गाडीचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती समोर येत असून गाडी थेट 400 फूट दरीमध्ये 40 कामगारांसह कोसळली.

या गाडीमध्ये लहान मुलं तसेच वयोवृद्ध असे 40 लोक प्रवास करत होते . दरम्यान या अपघाताची माहिती मिळतात सह्याद्री ट्रेकर्स तसेच स्थानिक लोकांनी 400 फूट खोलदरीत उतरून या चाळीस लोकांचा जीव वाचवला व सर्वांना जवळच्या शासकीय रुग्णालय रुग्णालयामध्ये भरती केले . या अपघातामध्ये तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना सातारा सिव्हिल हॉस्पिटल मध्ये पाठवण्यात आले असून किरकोळ दुपार दुखापत झालेल्या रुग्णांना महाबळेश्वर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी भरती केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!