सातारा 

ठोसेघर पूरग्रस्तांना राजन विचारे  यांचा मदतीचा हात 

सातारा ​(महेश पवार) :
तालुक्यातील परळी भागातील पांगारे,सांडवली,मोरबाग,जगमीन या ठिकाणी  अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले​,​ आणि भागातील अनेक लोक अडचणीत आल्याने शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी किरण जाधव युवासेना अधिकारी ठाणे यांच्या माध्यमातून  शिवसेनेचे ठाणे चे खासदार राजन विचारे यांना सर्व परिस्थिती सांगितली.​ या पार्श्वभूमीवर आज खा. ​राजन ​विचारे स्वतः उपस्थित राहुन  प्रत्येक घरात अन्नधान्य चे किट , ताट वाटी ,शाल शेगडी, साडी, आदी घरगुती उपयोगी साहित्याची मदत पोहचवली​. 

यावेळी शिवसेना नेते नितीन बानगुडे पाटील , जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे , उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते, किरण जाधव, तालुका प्रमुख अनिल गुजर, प्रशांत शेळके , तानाजी चव्हाण,  शहर प्रमुख निलेश मोरे,  शिवाजी  पवार, प्रणव सावंत, अमोल गोसावी, अभिजित सपकाळ,  शाम लोटेकर ,किशोर घोरपडे   रोहित निकम, यांसह अनेक शिवसैनिक उपस्थित होते ,

यावेळी पत्रकारांशी बोलताना खा विचारे यांनी सांगितले या भागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले​. आम्हाला जेवढी मदत करता येते ती करतो​ आहोत. कारण ते आमचं कर्तव्यच आहे. तर सांडवली धरणाचा पलिकडच्या लोकांच्या दळणवळणाचा प्रश्न व या परिसरातील लाईटचे प्रश्न सुध्दा आघाडी सरकारच्या माध्यमातून लवकरच मार्गी लावू व सर्व पुर्ववत करु असे सांगितले.

सचिन मोहिते यांनी या मदती बाबत  खा, विचारे, किरण जाधव सर्व ठाणे शिवसेना  पदाधिकारी यांचे शिवसेना सातारा विधानसभेच्या वतीने आभार मानले​.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: