सातारा 

साताऱ्यात १ जून पर्यंत कडक लॉकडाऊन 

सातारा (महेश पवार) :
करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर प्रशासन कठोर पावले टाकत असून आता सातारा जिल्ह्या​त १ जून २०२१ पर्यंत कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी ​शेखर सिंह यांनी ​’​ब्रेक द चेन​’​ अंतर्गत याबाबतचा आदेश जारी केला आहे. ​ 

सातारा जिल्ह्यात निर्बंध लागू असूनही रुग्णसंख्या कमी झालेली नाही. सकाळच्यावेळी खरेदीसाठी बाजारात गर्दी पाहायला मिळत आहे. ​त्या पार्श्वभूमीवर रविवार, २३ मे च्या मध्यरात्रीपासूनच कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्याचसोबत जिल्ह्यात कलम १४४ सुद्धा लागू करण्यात येणार आहे. 

जिहाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार… 
काय सुरु…. 
 • रुग्णालये ,निदान केंद्रे , दवाखाने, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, 24 तास औषध दुकाने औषध कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा व सदर सेवा पुरविणारी उत्पादक केंद्रे, वाहतूक व पुरवठा साखळीस परवानगी असेल. लस,सॅनिटायझर , मास्क व वैद्यकीय उपकरणे व अशा सेवांना लागणारा कच्चा माल व त्याच्याशी सबंधित उत्पादन व वितरण.
 • व्हेटरीनरी हॉस्पिटल्स, अनिमत्र केअर शेल्टर्स व पेट शॉप्स.
 • दुध संकलन केंद्रे सकाळी 07.00 ते 09.00 वाजेपर्यंत सुरु राहतील. वितरणाबाबत फक्त घरपोच दुध​ ​वितरणास परवानगी असेल​. ​
 • शेती विषयक सेवा व शेती सुरु राहण्यासाठी शेतकरी यांना आवश्यक असणारी बियाणे, खाते, शेती विषयक​ उपकरणे व त्यांची दुरुस्ती व देखभाल पुरविणाऱ्या सेवांची दुकाने उघडता येणार नाहीत. तथापी सकाळी​ ​07.00 ते सायंकाळी 05.00 या वेळेत घरपोच सेवा देणेस मुभा असेल. त्यासाठी ग्राहकांना विक्रेत्यांकडे​ ऑनलाईन किंवा फोन संपर्काने मागणी करावी लागेल.
 • शिवभोजन थाळी योजना फक्त पार्सल सुविधा सुरु राहील.
 • शीतगृहे व गोदाम सेवा
 • प्रसार माध्यमे ​सुरु राहतील. ​
 • पेट्रोल/डिझेल पंप फक्त वर नमूद केलेल्या सट दिलेल्या वाहनांसाठी व अत्यावश्यक सेवेतील खाजगी​ व शासकीय वाहने, वैद्यकीय सुविधा पुरवणारी वाहने व शासकीय धान्य पुरवठा करणारी वाहने,प्रसार माध्यमे,​ वृत्तपत्रे, मिडियाचे कर्मचारी, माल वाहतक करणारी वाहने इ. साठीच सुरु राहतील. अत्यावश्यक सेवा व​ ​वैदयकीय सेवा यासाठी, पेट्रोल/डिझेल पंप 24 तास चालू राहतील.
 • टपाल सेवा
 • लस/औषधे/जीवनरक्षक औषधे सबंधित वाहतूक हाताळणारे कस्टम​ ​हाउस एजंट 
काय बंद :​ 
 • व्यापारी दुकाने व इतर सर्व दुकाने व आस्थापना बंद राहतील.
 • उपहारगृह, बार, लॉज, हॉटेल्स, रिसॉर्ट, मॉल,बाजार, मार्केट बंद राहतील.
 • भाजी मार्केट, फळ मार्केट, आठवडी व दैनंदिन बाजार, मंडई, फेरीवाले पूर्णपणे बंद राहतील.
 • वाईन शॉप, बिअर शॉपी, देशी दारु दुकाने व तत्सम आस्थापना बंद राहतील
 • मटन, चिकन, अंडी, मासे इत्यादींची विक्री पूर्णपणे बंद राहतील
 • रस्त्याच्या कडेला असणारी खाद्य पदार्थ विक्रेते पूर्णपणे बंद राहतील
 • सर्व किराणा दुकाने, सर्व किरकोळ व ठोक विक्रेते, सर्व इतर व्यवसाय करणारे व्यापरी दुकाने व​ ​इतर सर्व दुकाने व आस्थापना बंद राहतील.
 • सर्व कृषी उत्पन बाजार समिती किरकोळ व ठोक विक्रीची ठिकाणे मोंढा/आडत भाजी मार्केट​ बंद राहतील.
 • सर्व भाजीपाला, बेकरी, फळ विक्रेते पूर्णपणे बंद राहतील.
 • माल वाहतूक व अत्यावश्यक सेवेतील वाहनांच्या दुरुस्तीसाठी गॅरेज, तसेच सदर वाहनांच्या​ ​स्पेअरपार्टचा पुरवठा स्पेअरपार्ट दुकाने पूर्णपणे बंद राहतील.
 • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाव्दारे विहित केलेल्या सर्व सेवा बंद राहतील.
 • सहकारी, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (२५) व खाजगी बँका व सहकारी बँका पूर्णपणे बंद राहतील.
 • सर्व नॉन बँकिंग वित्तीय महामंडळे पूर्णपणे बंद राहतील.
 • सर्व सूक्ष्म वित्तीय संस्था पूर्णपणे बंद राहतील.
 • बांधकाम क्रिया पूर्णपणे बंद राहतील.
 • प्रवासी वाहतूक​ आणि ​सार्वजनिक वाहतूक.
 • महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस वाहतूक जिल्ह्यांतर्गत पर्णपणे बंद राहील.
या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधितांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा व भारतीय दंड विधानाची विविध कलमे तसेच भारतीय साथरोग अधिनियम अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल.​​
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: