सातारा 

सौरभ पाटील यांनी केली सेटलिंग टॅंकच्या कामाची पाहणी

कराड (अभयकुमार देशमुख) :
लोकशाही आघाडीचे अध्यक्ष सुभाष पाटील यांनी चार दिवसांपूर्वी सेटलिंग टॅंकमधील साठलेला गाळ आणि स्वच्छतेबाबत समंधीत अधिका-याना विचारणा केली होती. त्यानंतर कराड शहराला पाणी पुरवठा करणारे सेटलिंग टॅंकमधील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झाली. कराड नगरपरिषदेचे सफाई कर्मचारी सेटलिंग टॅंकची स्वच्छता करत आहेत. याकामाची पाहणी करण्यासाठी कराडनगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते सौरभ पाटील यांनी त्याठिकाणी आपल्या सहका-यासह हजेरी लावली.

यावेळी त्यांनी नगरपरिषदेच्या कर्मचा-यांचे कौतुक केले. कोरोना महामारिच्या काळात नगरपरिषदेचे कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता कराडकरांची सेवा करत आहेत. असंही सौरभ पाटील यांनी सांगितले. यावेळी शिवाजी पवार,जयंत बेडेकर, गोळेश्वर ग्राम पंचायतचे माजी सदस्य महेश कदम, परिषदेचे अधिकारी तेवरे आणि पाणी पुरवठा कर्मचारी उपस्थित होते.

saurabh patil

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: